पर्यावरण अभ्यासक निलिशा देसाई यांचे कोल्हापुरात निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 08:07 AM2019-02-03T08:07:29+5:302019-02-03T08:09:40+5:30
पर्यावरण अभ्यासक डॉ. निलिशा प्रकाश देसाई (वय ३२)यांचे रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
कोल्हापूर : पर्यावरण अभ्यासक डॉ. निलिशा प्रकाश देसाई (वय ३२)यांचे रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता आणि समावेशक केंद्र येथे सहायक संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या', पर्यावरण शास्त्र विषयातील संशोधक म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या पार्थिवावर सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्टडी ऑन काँझर्वेशन ऑफ आर्रबन विल्डरनेस :कोल्हापूर सिटी असा संशोधन प्रबंध त्यांनी आपल्या पीएचडीसाठी लिहिला होता.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या जैव विविधता समितीच्या त्या सदस्य होत्या. नदी-तलावांचे प्रदूषण,वायू प्रदूषण, पश्चिम घाट अश्या विषयात त्या प्रबोधन आणि संशोधन कामात सक्रिय होत्या.
पर्यावरण सद्यस्थिती अहवाल,कृष्णा नदीच्या प्रदूषण रोखण्यासाठी तयार केलेल्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवाल निर्मितीमध्ये त्याचा सहभाग होता. वनस्पती व पक्षी निरीक्षण आणि पर्यावरण अभ्यासात त्या सतत कार्यरत व पर्यावरण विषयक अनेक प्रश्नांशी संबधित मित्र,इन्व्हायरो लीगल फोरम यासह अन्य सामाजिक संस्थाच्या कामात त्याचा सक्रिय सहभाग होता.अनेक वृत्तपत्र लेख, शोधनिबंध, वृत्तपत्र लेख, शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करून त्यानी पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे काम केले होते.