वडगावमध्ये पर्यावरणपूरक सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:01 AM2020-12-05T05:01:21+5:302020-12-05T05:01:21+5:30
पर्यावरणपूरक सायकल रॅली, प्लास्टिक संकलन पालिकेच्या वतीने करण्यात आले. पालिका चौकातील झेंडा चौकात नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या हस्ते ...
पर्यावरणपूरक सायकल रॅली, प्लास्टिक संकलन पालिकेच्या वतीने करण्यात आले. पालिका चौकातील झेंडा चौकात नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात झाली, तर वसुंधरेचे पूजन मुख्याधिकारी सुषमा कोल्हे शिंदे यांनी केले. या पार्श्वभूमीवर वसुंधरेची शपथ उपस्थितांना देण्यात आली. यावेळी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, शरद पाटील, सुनीता पोळ आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष माळी यांनी, वायू, अग्नी, जल, पृथ्वी आणि आकाश या पंच महाभूतांचे संवर्धन करून वसुंधरेला सुंदर बनवूया. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये शहराला अव्वल दर्जा मिळविण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या रॅलीमध्ये प्लास्टिक बंदी जनजागृती, कचरामुक्त शहर, पर्यावरण संवर्धन, आदी घोषणाद्वारे प्रभागामध्ये जनजागृती करण्यात आली. दिव्यस्वप्न फौंडेशन, बहिरेवाडी यांनी केले. यावेेळी बळवंतराव यादव हायस्कूल , वडगाव हायस्कूलचे एन.सी.सी. व एन.एस.एस.चे विद्यार्थी, पालिका कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
●फोटो ओळ ०४ वडगाव रॅली
पेठवडगाव येथील पालिका चौकात पर्यावरणपूरक सायकल रॅलीत नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे-शिंदे, सुनीता पोळ, शरद पाटील, आदीसह नागरिक उपस्थित होते. (छाया : क्षितिज जाधव)
-----