महापालिकेमार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:17+5:302021-09-06T04:28:17+5:30
या स्पर्धेसाठी काही महत्त्वाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. गणेशमूर्ती कमी उंचीची पर्यावरणपूरक असावी, मंडपातील आरास प्लास्टिकमुक्त असावी, विद्युत ...
या स्पर्धेसाठी काही महत्त्वाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. गणेशमूर्ती कमी उंचीची पर्यावरणपूरक असावी, मंडपातील आरास प्लास्टिकमुक्त असावी, विद्युत रोषणाई व ध्वनीक्षेपकाचा वापर कायदेशीर व निश्चित केलेल्या मानांकनाप्रमाणे करावा, निर्माल्य निर्माल्यकुंडातच टाकावे, सिंगलयुज प्लस्टिक व प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा, मंडळांचे देखावे स्वच्छतेचे संदेश देणारे असावेत, गणेश मंडळाद्वारे लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवावी, ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करावी, घरच्या घरी खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याबाबत जागृती करावी, डासांची उत्पत्ती होणार नाही याच्या खबरदारीसाठी गांभीर्य पटवून द्यावे, समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी, परंपरा यांना प्रतिबंधित करणारे कलात्मक देखावे ,पथनाट्य, आणि सजिव देखावे आदी निकषाच्या अनुषंगाने स्पर्धेचे परिक्षण केले जाणार आहे.
विजेत्या प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांक विजेत्या मंडळांना प्रशस्तिपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेकरिता विभागीय कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे.