लहान कारखानदारांना ईपीएफ योजना लागू करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:58+5:302021-01-02T04:21:58+5:30
(फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरात छोट्या युनिटचे यंत्रमाग कारखाने आहेत. परिसरात ४-६ मागाचे एक युनिटप्रमाणे ...
(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरात छोट्या युनिटचे यंत्रमाग कारखाने आहेत. परिसरात ४-६ मागाचे एक युनिटप्रमाणे २४-४८ मागाचे कारखाने आहेत. या कारखान्यांना प्राव्हिडंड फंड लागू होत नाही. त्यामुळे अशा लहान कारखानदारांना ईपीएफ योजना लागू करू नये, अशा मागणीचे निवेदन पॉवरलूम असोसिएशनने विभागीय प्राव्हिडंड फंड आयुक्त (सोलापूर) डॉ. हेमंत तिरपुडे यांना सोलापूर येथे दिले.
विभागीय आयुक्त व सहाय्यक आयुक्तांकडून पॉवरलूमला प्राप्त झालेल्या पत्रामध्ये इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाला प्राव्हिडंड फंड लागू करावा व त्यासाठी पॉवरलूम असोसिएशनने यंत्रमाग उद्योजकांना प्रवृत्त करावे, असा आशय होता. त्याबद्दलचा खुलासा करण्यासाठी व इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाच्या रुपरेषेची माहिती या दोन्ही अधिकाऱ्यांना देऊन प्राव्हिडंड फंड लागू होत नसल्याबाबतचे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात उपाध्यक्ष दत्तात्रय कनोजे, रफिक खानापुरे व चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता.
(फोटो ओळी)
०१०१२०२०-आयसीएच-०२
छोट्या यंत्रमाग कारखानदारांना ईपीएफ योजना लागू करू नये, या मागणीचे निवेदन पॉवरलूम असोसिएशनने विभागीय प्राव्हिडंड फंड आयुक्त (सोलापूर) डॉ. हेमंत तिरपुडे यांना सोलापूर येथे दिले.