कोल्हापूर जिल्ह्यातील बिघडलेली समीकरणे मिटवा : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:50 AM2017-12-02T00:50:28+5:302017-12-02T00:53:28+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानाही मी मंत्री...का तू मंत्री...असे करत एकमेकांच्या पायात पाय घातल्याने पक्षावर ही वेळ आली आहे,

Eradicate errors in Kolhapur district: Ashok Chavan | कोल्हापूर जिल्ह्यातील बिघडलेली समीकरणे मिटवा : अशोक चव्हाण

कोल्हापूर जिल्ह्यातील बिघडलेली समीकरणे मिटवा : अशोक चव्हाण

googlenewsNext
ठळक मुद्देआवळेंची गटबाजीबद्दल खदखद; पतंगरावांची विषय संपविण्याची ग्वाही, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठकजयवंतराव काळजी करू नका, मी येथील विषय संपवितो

कोल्हापूर : जिल्ह्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानाही मी मंत्री...का तू मंत्री...असे करत एकमेकांच्या पायात पाय घातल्याने पक्षावर ही वेळ आली आहे, अशा शब्दांत माजी समाजकल्याण मंत्री जयवंतराव आवळे यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासमोरच शुक्रवारी खदखद व्यक्त केली. यावर माजी वनमंत्री आमदार पतंगराव कदम यांनी मी इथला पालकमंत्री राहिल्याने मला सर्व माहीत असून हा विषय मी संपवितो, असे सांगितले, तर काँग्रेसची जिल्ह्यातील बिघडलेली समीकरणे बसून मिटवा, अशी विनंती कदम यांना चव्हाण यांनी केली.

स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पतंगराव कदम, जयवंतराव आवळे, आमदार सतेज पाटील, प्रभारी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, शहराध्यक्षा संध्या घोटणे, माजी मंत्री भरमू पाटील, प्रकाश सातपुते, गुलाबराव घोरपडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नांदेड महापालिकेत एकहाती काँग्रेसची सत्ता आणल्याबद्दल अशोक चव्हाण यांचा जिल्हा कॉँग्रेसतर्फे पुष्पहार, अंबाबाई मूर्तीची प्रतिकृती व शाल देऊन सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेला दुसरे कोणीही जबाबदार नाही तर पक्षातील घरभेदीच याला कारणीभूत असल्याचे आवळे यांनी सांगितले. काँग्रेसशी गद्दारी करणाºयांना जागा दाखविण्याची वेळ आली असून हे मतभेद दूर केल्यावर पक्ष राज्यात ‘क्रमांक एक’वर जाईल, असेही त्यांनी सांगितले.

त्यावर पतंगराव कदम यांनी मी पालकमंत्री राहिल्याने मला येथील सर्व विषय माहिती असून जयवंतराव काळजी करू नका, मी येथील विषय संपवितो. एकदा ठरवून निर्णय घेतला की येथील लोक ऐकतात, महापालिका निवडणुकीत न ऐकणाºया महादेवराव महाडिकांना तुमचे आमचे जमणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.आवळे यांच्या भाषणाचा धागा पकडत जुने विषय घोळून चालणार नाही, तर नव्या पिढीला संधी देत सर्वांना बरोबर घेत चांगले काम करूया व पक्ष राज्यात व पश्चिम महाराष्टÑात कोल्हापूर ‘क्रमांक एक’वर आणूया, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले तसेच कॉँग्रेसची जिल्ह्यातील बिघडलेली समीकरणे बसून मिटवून तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, अशी विनंती कदम यांना चव्हाण यांनी केली.

भ्रमात राहू नका
राज्यातील सर्व घटक भाजप सरकारवर नाराज आहेत, असे असले तरी कॉँग्रेसला फायदा होईल या भ्रमात न राहता सत्तेत येण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथपर्यंत पोहोचून पक्षाची संघटनात्मक यंत्रणा भक्कम करावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

१२ डिसेंबरच्या मोर्चात ताकदीने उतरणार
कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात १२ डिसेंबरला काढण्यात येणाºया धडक मोर्चात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने व ताकदीने जाऊ, अशी ग्वाही पी. एन. पाटील यांनी दिली.
‘दादां’चा रोज एकाला ‘हार’
वर्तमानपत्रात रोज महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे महामंडळासह विविध पदे देतो, असे सांगून रोज एकाला भाजपमध्ये प्रवेश देत हार घालत असल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. त्यामुळे तिकडे जाणाºयांची संख्याही वाढली असून हे पुरोगामी विचारांच्या कोल्हापूरसाठी खेदजनक असल्याची टीका पतंगराव कदम यांनी केली. आता वातावरण बदलत असून गेलेल्यांना परत घ्यायचे की नाही याचा निर्णय मी व अशोक चव्हाण घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Eradicate errors in Kolhapur district: Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.