सुविधा पुरविल्यास कोविड सेंटर सुरू करण्यास ‘ईएसआयसी’ तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:49+5:302021-04-20T04:23:49+5:30
‘शंभर बेड’ची अद्याप सुरुवात नाही शंभर बेडच्या ईएसआयसी रुग्णालयाच्या ४० कोटींच्या कामाला गेल्या वर्षी जानेवारीत केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली. ...
‘शंभर बेड’ची अद्याप सुरुवात नाही
शंभर बेडच्या ईएसआयसी रुग्णालयाच्या ४० कोटींच्या कामाला गेल्या वर्षी जानेवारीत केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेल्या रुग्णालयाचा आराखडा श्रम मंत्रालयास सादर झाला. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दिल्लीतील ठेकेदाराची नियुक्ती झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्याप काम सुरू झालेले नाही. त्याबाबतचे कारणही कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयाला कळविण्यात आलेले नाही. या शंभर बेड आणि ऑपरेशन थिएटर सुरू झाल्यास येथील वैद्यकीय सेवेची गती वाढणार आहे.
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टीक्षेपात
विमाधारक कामगारांची संख्या : दीड लाख
या कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांची संख्या : सुमारे पाच लाख
ईएसआयसी रुग्णालयातील रोजची ओपीडीची संख्या : सुमारे २००
दरमहा ॲॅडमिट होणारे रुग्ण : सुमारे ५०
फोटो (१९०४२०२१-कोल-ईएसआयसी हॉस्पिटल) : कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील ईएसआयसी रुग्णालयात विमाधारक कामगार रुग्णांसाठी तीस बेडच्या दोन वॉर्डमध्ये ॲडमिट करून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
===Photopath===
190421\19kol_1_19042021_5.jpg
===Caption===
फोटो (१९०४२०२१-कोल-ईएसआयसी हॉस्पिटल) : कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील ईएसआयसी रूग्णालयात विमाधारक कामगार रूग्णांसाठी तीस बेडच्या दोन वॉर्डमध्ये ॲडमिट करून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)