जीवनावश्यक वस्तू ईझी ॲपमुळे घरपोच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:23 AM2021-05-11T04:23:59+5:302021-05-11T04:23:59+5:30

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू मागविण्याची सुविधा महानगरपालिका व सेवा इन्फोटेक यांच्यावतीने सोमवारपासून सुरू करण्यात आली असून ...

Essentials Easy app will get you home | जीवनावश्यक वस्तू ईझी ॲपमुळे घरपोच मिळणार

जीवनावश्यक वस्तू ईझी ॲपमुळे घरपोच मिळणार

googlenewsNext

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू मागविण्याची सुविधा महानगरपालिका व सेवा इन्फोटेक यांच्यावतीने सोमवारपासून सुरू करण्यात आली असून त्याकरिता EZY KOLHAPUR या ऑनलाइन ॲप कार्यान्वित केले आहे.

महानगरपालिकेचे उपायुक्त निखिल मोरे व सहायक आयुक्त चेतन कोंडे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी हे ऑनलाइन ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. यावेळी सेवा इन्फोटेकचे जयराज चव्हाण उपस्थित होते.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिक जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्याच्या नावाखाली बाहेर पडतात. शहरात रुग्णांची संख्या वाढू नये तसेच कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. या अनुषंगाने भाजीपाला, फळे, किराणा माल, दूध इत्यादींची दैंनदिन गरज पाहता घरपोच जीवनावश्यक साहित्य नागरिकांपर्यंत कसे पोहचविता येईल, याचे नियोजन करण्यात आले आहे.

ईझी कोल्हापूर या ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून ‍ही सेवा सुरू करण्यात आली आहे. हे ॲप सेवा इन्फोटेकचे जयराज चव्हाण यांनी विनामोबदला महानगरपालिकेला उपलब्ध करून दिले आहे.

ॲपवर २५० पेक्षा जास्त व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक प्रभागातील मेडिकल स्टोअर, किराणा दुकानदार यांची चार विभागीय कार्यालयनिहाय यादी उपलब्ध करून दिलेली आहे. या ॲपद्वारे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उदा. किराणा, भाजी पाला, फळे, औषधे, चिकण-मटण इत्यादी घरबसल्या या घरपोच मिळणार आहे. ही सेवा प्रभागनिहाय स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सहाय्याने प्रत्येक प्रभागामध्ये सुरळीत ठेवण्यात येणार आहे. ॲपवर प्रभाग समिती सचिवांची यादी व त्यांचे संपर्क क्रमांकही दिलेले आहेत.

- बेडबाबत माहिती मिळणार -

कोणालाही जर कोविड काळामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करावयाची इच्छा असल्यास त्याचीही नोंदणी या ॲपद्वारे करता येते.

या ॲपमध्ये बेड संदर्भातील माहिती, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, सीपीआर हॉस्पिटल, महापालिकेचे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र इत्यादींचे फोन नंबर्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये नागरिकांना कोरोना बाबतीत उद‌्भवणाऱ्या काही समस्या व सूचना असतील तर त्याही समस्या व सूचना या ॲपद्वारे नागरिकांना नोंद करता येणार आहे.

१० हजार जणांनी केले डाऊनलोड-

सोमवारी ॲप कार्यान्वित केल्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे ॲप शहरातील दहा हजारांहून अधिक नागरिकांनी डाऊनलोड केले.

Web Title: Essentials Easy app will get you home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.