ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:07+5:302020-12-27T04:18:07+5:30

खोची : कोरोनाचे संकट अजून दूर झालेले नाही. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका ...

Establish Mahavikas Aghadi rule over Gram Panchayats | ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करा

ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करा

Next

खोची : कोरोनाचे संकट अजून दूर झालेले नाही. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत. तसेच ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी केले.

शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत अनुक्रमे ३३ व २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने गावात ईर्षा, वादविवाद होत असतात. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनते. अगोदरच कोरोनाच्या संकटाने भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे निवडणुका बिनविरोध करण्यास प्राधान्य दिल्यास अधिक सोयीचे होईल. विकासाची चळवळ गतिमान होईल. त्यासाठी शिरोळ तालुक्यात बिनविरोध होणाऱ्या गावांना ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा केली आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच बिनविरोध होण्याचे प्रयत्न जिथे अयशस्वी होतील, त्या गावात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवून एकतर्फी विजय मिळवावा, असे आवाहन मंत्री यड्रावकर यांनी केले.

(मंत्री यड्रावकर यांचा फोटो वापरावा.)

Web Title: Establish Mahavikas Aghadi rule over Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.