रिक्षा कल्याणकारी मंडळाची त्वरित स्थापना करा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:29 AM2021-08-25T04:29:32+5:302021-08-25T04:29:32+5:30
रिक्षाचालकांना भविष्य निर्वाह निधी लागू करावी. शासकीय स्तरावरील मोफत घरकुल योजना सुरू करावी. शासकीय अपघात विमा, सवलतीच्या दरामध्ये सुट्टे ...
रिक्षाचालकांना भविष्य निर्वाह निधी लागू करावी. शासकीय स्तरावरील मोफत घरकुल योजना सुरू करावी. शासकीय अपघात विमा, सवलतीच्या दरामध्ये सुट्टे भाग द्यावेत. विवाह, आजारपण, इतर व्यवसाय, आदींसाठी सहज पद्धतीने एक लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळावे. ५५ वर्षांवरील सर्व रिक्षाचालकांना योग्य अशी दरमहा पेन्शन मिळावी, आदी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी रिक्षा कल्याणकारी मंडळाची स्थापना लवकर होणे आवश्यक आहे. त्याबाबत मुख्यमंत्री, परिवहनमंत्री आणि विरोधी पक्षनेता या संघटनेचे शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती राष्ट्रप्रेमी संघटनेचे संस्थापक शरद सोनुले यांनी दिली. निर्दशनामध्ये संघटनेचे राज्य अध्यक्ष मारुती पोवार, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय बोंद्रे, शहर अध्यक्ष अंजुम शेख, दशरथ नंदीवाले, आदी सहभागी झाले.
फोटो (२४०८२०२१-कोल-रिक्षा संघटना आंदोलन) : कोल्हापुरात मंगळवारी दसरा चौकात रिक्षा कल्याणकारी मंडळ स्थापनेच्या मागणीबाबत कोल्हापूर जिल्हा राष्ट्रप्रेमी रिक्षा संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.