जिल्ह्यात निवडणूक कर्मचाऱ्यांची ३६७७ पथके स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 11:56 AM2019-10-07T11:56:41+5:302019-10-07T11:57:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होत आहे; त्यासाठी लागणाºया कर्मचाºयांचे दुसरे रॅँडमायझेशन (सरमिसळ) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होत आहे; त्यासाठी लागणाºया कर्मचाºयांचे दुसरे रॅँडमायझेशन (सरमिसळ) रविवारी झाले. जिल्ह्यात कर्मचाºयांची एकूण ३६७७ पथके स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर निवडणुकीसाठी १४ हजार ७०५ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक बाबूलाल मीना, संजीवकुमार झा, सुरेंद्र राम, संजीव सिंग, अमरनाथ तळवाडे यांच्यासमोर रॅँडमायझेशन झाले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, मनुष्यबळ पथकाचे साहाय्यक नोडल अधिकारी भूषण देशपांडे, आदी उपस्थित होते.
यापूर्वी घेण्यात आलेल्या कर्मचाºयांच्या पहिल्या रॅँडमायझेशन (सरमिसळ)मध्ये १२५ टक्के या प्रमाणे १६ हजार ७३० कर्मचारी निवडण्यात आले होते. रविवारी झालेल्या दुसºया रॅँडमायझेशनमध्ये ११० टक्के याप्रमाणे १४ हजार ७०५ कर्मचारी निश्चित करण्यात आले असून, पथकेही स्थापन करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील ३३४२ मतदान केंद्रांसाठी १० टक्के जादा राखीव याप्रमाणे ३६७७ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्राला चार कर्मचाºयांचे एक पथक राहणार आहे. कर्मचाºयांची संख्या निश्चित करण्यात आली असून, त्यांच्यावर कोणता विधानसभा मतदारसंघ व कोणते पथक हे अंतिम करण्यात आले आहे. या कर्मचाºयांना आपल्याला कोणता विधानसभा मतदारसंघ व आपण कोणत्या पथकात आहोत, हे समजले आहे. असे असले तरी त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर आहोत, हे अद्याप समजले नसून, ते मतदानाच्या आदल्या दिवशी कळविले जाणार आहे. या दिवशी तिसरे रॅँडमायझेशन होऊन केंद्रांची जबाबदारी निवडणूक विभागाकडून दिली जाणार आहे.
============================================
(प्रवीण देसाई)