मगदूम इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मार्गदर्शन कक्षाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:22 AM2020-12-08T04:22:34+5:302020-12-08T04:22:34+5:30

बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व पालकांसाठी या कक्षाचे मार्गदर्शन महत्त्वत्वपूर्ण ठरणार आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटात शैक्षणिक क्षेत्रात बदल झाले ...

Establishment of Admission Guidance Cell in Magdoom Engineering | मगदूम इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मार्गदर्शन कक्षाची स्थापना

मगदूम इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मार्गदर्शन कक्षाची स्थापना

Next

बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व पालकांसाठी या कक्षाचे मार्गदर्शन महत्त्वत्वपूर्ण ठरणार आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटात शैक्षणिक क्षेत्रात बदल झाले आहेत. प्रवेश प्रक्रिया संबंधीचे मार्गदर्शन या कक्षामधून उपलब्ध करून दिले जात आहे. केंद्रीय प्रवेश पद्धतीबद्दल व महाविद्यालयाबद्दल संभ्रमावस्थेत असलेल्या विध्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहेत. महाविद्यालयाच्यावतीने तज्ज्ञांकडून मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांच्या उपस्थितीत प्रकल्पांची प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. विविध कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूव्दारे विद्यार्थ्यांना नोकरीची संधीही उपलब्ध करुन दिली जाते. त्यामुळे या प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाचा लाभ घेण्याचे आवाहनही अध्यक्ष मगदूम यांनी केले आहे. यावेळी उपाध्यक्षा अ‍ॅड. सोनाली मगदूम व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक मुदगल उपस्थित होते.

फोटो - ०७१२२०२०-जेएवाय-०७-डॉ. विजय मगदूम

Web Title: Establishment of Admission Guidance Cell in Magdoom Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.