तृतीयपंथीयांच्या तक्रारी संदर्भात समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:08+5:302021-06-02T04:20:08+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच तक्रारी संदर्भात प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात ...

Establishment of a committee on third party complaints | तृतीयपंथीयांच्या तक्रारी संदर्भात समिती स्थापन

तृतीयपंथीयांच्या तक्रारी संदर्भात समिती स्थापन

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच तक्रारी संदर्भात प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी मंगळवारी दिली.

ही समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असून त्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, अन्न व नागरी पुरवठा अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य असतील. जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेली सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती ॲड. दिलशाद मुजावर तसेच तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या नामवंत संस्थातील दोन तृतीयपंथीय व्यक्ती यामध्ये अमृता यशवंत सुतार व प्रिया ऊर्फ स्वप्निल भरत सवाईराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे विहीत कालावधीत निवारण करणे, तक्रारीबाबत पडताळणी करून आवश्यकतेनुसार विभागीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळास शिफारस करणे व समितीने तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या अडचणींचा, समस्यांचा, तक्रारींचा सखोल अभ्यास करणे व योग्य त्या उपाययोजना शासनास सुचविणे आदी बाबींवर ही समिती कार्य करणार आहे.

Web Title: Establishment of a committee on third party complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.