कोल्हापुरात सद्भावना मंचची स्थापना, अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार
By संदीप आडनाईक | Published: December 22, 2023 07:15 PM2023-12-22T19:15:56+5:302023-12-22T19:16:10+5:30
कोल्हापूर : दंगलीने झालेल्या जखमा अनेक वर्षे खोलवर रुतून राहतात. म्हणून द्वेष आणि जाती धर्माच्या विरोधात सद्भावना निर्माण करणे ...
कोल्हापूर : दंगलीने झालेल्या जखमा अनेक वर्षे खोलवर रुतून राहतात. म्हणून द्वेष आणि जाती धर्माच्या विरोधात सद्भावना निर्माण करणे आणि टिकवणे यासाठी नव्याने स्थापन केलेल्या सद्भावना मंचची कोल्हापुरात स्थापना करण्यात आली.
सामाजिक ऐक्य परिषद, सार्वजनिक धर्म परिषद घेण्याचा तसेच नऊ कलमी कार्यक्रम घेऊन जिल्ह्यात घेऊन जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, उपाध्यक्षपदी भन्ते डॉ. कश्यप, सचिवपदी ॲड. अकबर मकानदार, कार्याध्यक्षपदी धनाजी गुरव यांची यावेळी निवड करण्यात आली.
कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग मध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पारनेर येथील जमाते इस्लामी हिंदचे डॉ. सय्यद रफिक होते. या बैठकीत हाजी मोहम्मद पठाण, कादरभाई मलबारी, जमाते इस्लामी हिंद, कोल्हापुरचे ॲड. अकबर मकानदार, बबन रानगे, डॉ. राजेंद्र कुंभार, धनाजी गुरव, वसंतराव मुळीक, मुफ्ती अश्रफ, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब भोसले, महेश मछले, जाफर बाबा यांनी मनोगत व्यक्त केले.