धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेमार्फत वॉटर एटीएमची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:57+5:302021-08-26T04:26:57+5:30

या वॉटर एटीएमचे उद्घाटन कोल्हापूर ग्रेन मर्चंटसचे उपाध्यक्ष संजीव परीख यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या एटीएमद्वारे विक्री होणाऱ्या पाण्याच्या ...

Establishment of Water ATM through Grain Merchant Inspired Child Welfare Organization | धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेमार्फत वॉटर एटीएमची उभारणी

धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेमार्फत वॉटर एटीएमची उभारणी

Next

या वॉटर एटीएमचे उद्घाटन कोल्हापूर ग्रेन मर्चंटसचे उपाध्यक्ष संजीव परीख यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या एटीएमद्वारे विक्री होणाऱ्या पाण्याच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम देणगी म्हणून संस्थेकडे जमा होतील. त्याचा उपयोग सामाजिक उपक्रमांसाठी केला जाणार आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी देणगीमूल्य आकारण्यात येणार असल्याचे ‘कोल्हापूर धान्य व्यापारी’ संस्थेचे अध्यक्ष नयन प्रसादे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किशोर तांदळे, बलराज निकम, गजानन सावर्डेकर, चंद्रकांत हळदे, सुभाष अथणे, सदानंद कोरगावकर, गणेश सन्नकी, राजेंद्र हळदे, अमित खटावकर, राजशेखर पाटील, अमोल नष्टे, प्रशांत घोडके, राजू आवटे, शशी कोकाटे, बी. एम. शिरहट्टी, शिवाजी मोटे, शेखर कामेरकर, सिद्धार्थ कापसे, सचिव रमेश पाटील, अशोक वडणगेकर उपस्थित होते.

फोटो (२५०८२०२१-कोल-धान्य व्यापारी संस्था) : लक्ष्मीपुरी येथे मंगळवारी कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेच्या वॉटर एटीएमचे उद्घाटन कोल्हापूर ग्रेन मर्चंटसचे उपाध्यक्ष संजीव परीख यांच्या हस्ते झाले. यावेळी नयन प्रसादे, किशोर तांदळे, बलराज निकम, गजानन सावर्डेकर, आदी उपस्थित होते.

250821\25kol_4_25082021_5.jpg

फोटो (२५०८२०२१-कोल-धान्य व्यापारी संस्था) : लक्ष्मीपुरी येथे मंगळवारी कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेच्या वॉटर एटीएमचे उदघाटन कोल्हापूर ग्रेन मर्चंटसचे उपाध्यक्ष संजीव परीख यांच्या हस्ते झाले. यावेळी नयन प्रसादे, किशोर तांदळे, बलराज निकम, गजानन सावर्डेकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Establishment of Water ATM through Grain Merchant Inspired Child Welfare Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.