मोबाईलच्या जमान्यातही लॅण्डलाईन, क्वाईन बाॅक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:56+5:302021-09-03T04:23:56+5:30

कोल्हापूर : चालता चालता, वाहनात बसून आणि कुठेही कधीही कोणाला फोन करता येणारा अत्याधुनिक ४ जी आणि आता ...

Even in the age of mobile, the landline, the coin box's 'tring tring' | मोबाईलच्या जमान्यातही लॅण्डलाईन, क्वाईन बाॅक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’

मोबाईलच्या जमान्यातही लॅण्डलाईन, क्वाईन बाॅक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’

Next

कोल्हापूर : चालता चालता, वाहनात बसून आणि कुठेही कधीही कोणाला फोन करता येणारा अत्याधुनिक ४ जी आणि आता ५जी मोबाईलच्या तेज तर्राट जमाना सुरू आहे. अशा जमान्यातही कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ३३ हजार ४३७ लॅण्डलाईन, तर २६६ लँण्डलाईन पीसीओ काॅईनबाॅक्स उपलब्ध आहेत. या पाठीमागे बीएसएनएलच्या सेवेवर आजही इतक्या लोकांचा विश्वास टिकून आहे. या टेलिफोनधारकांमध्ये सरकारी खात्यांसह नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

मोबाईलचे नेटवर्क जाम झाल्यानंतर अनेकदा फोन लागत नाही. अशावेळी लॅंडलाईनचा मोठा आधार नागरिकांना होत आहे. विशेषत: सरकारी विभागात आजही लँडलाईन वापरला जात आहे. कारण या फोनवरून केवळ कामाचीच बोलणे होते. अवांतर बोलणे होत नाही. याशिवाय आजही टेलिफोन हे सरकारी खात्याची वेगळी ओळख आहे. अनेकदा मोबाईल वरून आलेले फोन फेक असू शकतो म्हणून लँडलाईन आजही आपली विश्वासर्हता टिकवून आहे. यासह अनेक सार्वजनिक ठिकाणी क्वाईनबाॅक्स सुरू आहेत. या क्वाॅईन बाॅक्समधून मोबाईल फ्रेंडली नसलेले व ज्यांना आजही लँडलाईनवर विश्वास आहे, अशी मंडळी या क्वाईन बाॅक्सचा वापर करीत आहेत. केवळ एक रुपयांमध्ये हव्या त्या ठिकाणी फोन करता येत असल्याने क्वाईन बाॅक्स या लोकांना जवळचा वाटत आहे. ज्यांच्याकडे मोबाईल फोन नाही त्यांना क्वाईन बाॅक्स आजही आधार ठरत आहे. विशेषत: एस.टी.स्टँड, शासकीय रुग्णालये, रेल्वे, आदी गर्दीच्या ठिकाणी या क्वाईन बाॅक्सचा चांगला उपयोग होत आहे.

जिल्ह्यात २६६ लॅण्डलाईन क्वाईन बाॅक्स पीसीओधारक

आजही गर्दीच्या ठिकाणी जसे की जिल्ह्यातील विविध बसस्थानके, शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, रेल्वेस्थानक, मोठी शासकीय कार्यालये येथे आजही २६६ लॅण्डलाईन क्वाईन बाॅक्स पीसीओधारक कार्यरत आहेत. या ठिकाणी ज्यांच्याकडे मोबाईल फोन नाहीत. त्यांना या क्वाईन बाॅक्सचा उपयोग होत आहे. ज्यांना कुठल्याही फोनचा आधार नाही अशा अतिसामन्य लोकांना हे काॅईन बाॅक्स मोठा आधार ठरत आहेत.

शासकीय कार्यालयांसह खासगी आस्थापनांना आजही लॅण्डलाईनचा आधार

केंद्र शासनासह राज्य शासन, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये, खासगी कार्पोरेट आस्थपना, दुकाने अशा सर्व कार्यालयांमध्ये आजही लॅण्डलाईन फोन वापरला जात आहे. अनेक नागरिकांचा लॅण्डलाईन फोनवर दृढ विश्वास आहे. आजही ग्रामीण भागात लॅण्डलाईन क्रमांकावरच फोन करण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा नेटवर्क नसताना लॅण्डलाईनचा मोठा आधार दुर्गम भागातील लोकांना मिळतो. त्यामुळे मोबाईलच्या जमान्यात लॅण्डलाईन टिकून आहे.

कर्मचाऱ्यांवर देखरेखीसाठी लॅण्डलाईनचा अप्रत्यक्ष आधार

मोबाईलच्या वापरामुळे खासगी आस्थापना, दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी अनेकदा काम सोडून अन्यत्र फिरत असतात. मोबाईलवर फाेन केल्यानंतर सत्यता पडताळता येत नाही. अशावेळी लॅण्डलाईनवर फोन केल्यानंतर खरच तो कर्मचारी कामावर आहे की नाही, याची पडताळणी करता येते. त्यामुळे अनेकांनी आपल्या दुकानासह आस्थापनांमध्ये लॅण्डलाईन कार्यरत ठेवला आहे.

प्रतिक्रिया

आजही एखाद्या दुकानाची अथवा आस्थापनांमध्ये लॅण्डलाईन दूरध्वनी संचावरून झालेल्या व्यवहारांना विश्वासार्हता आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग लॅण्डलाईन बाळगून आहे.

- वैभव सावर्डेकर, व्यापारी

प्रतिक्रिया

लॅण्डलाईनचा वापर रोजच्या दैनंदिन व्यवहारांसाठी व्यापारी वर्ग आजही करतो. या क्रमांकावरून आलेला फोन म्हणजे त्या त्या दुकानांची विश्वासार्हता समजली जाते.

अनिल महाजन, धान्य व्यापारी

Web Title: Even in the age of mobile, the landline, the coin box's 'tring tring'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.