प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:26+5:302021-05-27T04:25:26+5:30
प्रारंभी ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी कोरोना नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य यादव ...
प्रारंभी ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी कोरोना नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य यादव यांनी आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या वाढीव वैद्यकीय यंत्रणेसाठी आरोग्य खात्याकडे पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. दरम्यान,कोरोना नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीने आजवर केलेल्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त करून सद्य:स्थितीतील कोरोना रुग्णवाढ रोखण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या प्रभागांची जोखीम घेण्याची गरज व्यक्त केली. यावेळी गटनेते किरण माळी, विनोद शिंगे यांनी मनोगत मांडले. बैठकीस सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, ग्रा. पं. सदस्य तसेच महेश पांडव, ॲड. अमित साजणकर, तलाठी संभाजी घाटगे, डॉ. आदित्य फडे आदी उपस्थित होते. विनायक पोतदार यांनी आभार मानले.