प्रत्येकाने माणसात आणि स्वतःतही देव शोधावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:28 AM2021-09-04T04:28:16+5:302021-09-04T04:28:16+5:30
कागल : भारत भूमी ही देव-देवतांच्या मंदिरांची आणि ऋषीमुनींची देवभूमी आहे. या भूमीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. मंदिरांच्या ...
कागल
: भारत भूमी ही देव-देवतांच्या मंदिरांची आणि ऋषीमुनींची देवभूमी आहे. या भूमीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. मंदिरांच्या माध्यमातून हा इतिहास पिढ्यानपिढ्या जोपासला जात आहे. अंधश्रद्धा न वाढविता प्रत्येकाने माणसा-माणसात किंबहुना स्वतः मध्येच देव शोधावा, असे प्रतिपादन भक्तीयोग आश्रम, हंचनाळ व मळणगावचे मठाधिपती प. पू. महेशानंद महास्वामीजी यांनी काढले.
कागलमधील कोष्टी गल्लीत जीर्णोद्धार करून नव्याने बांधलेल्या श्री महादेव मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्यात ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थितीत होते. श्री महास्वामीजी यांच्याहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा, तर मंत्री मुश्रीफ यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, चद्रंकात गवळी, प्रवीण काळबर, आशाकाकी माने, विजया निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. भैय्या माने, माजी नगराध्यक्ष मनोहर पाटील, रमेश माळी, अतुल जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत बंडा बारड यांनी, प्रास्ताविक प्रवीण काळबर यांनी, तर आभार संजय चितारी यांनी मानले.
मुश्रीफांचे धर्मसंस्थेला सदैव पाठबळ
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आजवर पाचशेहून अधिक मंदिरांच्या बांधकामामध्ये योगदान दिले आहे. या माध्यमातून त्यांनी धर्मसंस्थेला सदैव पाठबळ दिल्याचे सिद्ध झाले आहे, असे गौरवोदगार पूज्य महास्वामींनी काढले, तर हेमाडपंती शैलीत बांधलेल्या या महादेव मंदिरामुळे कागलच्या धार्मिक वैभवात भर पडली आहे, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.
फोटोओळी.......
कागलमधील श्री महादेव मंदिराची वास्तुशांती आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात पु. महेशानंद महास्वामीजी महाराज, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व प्रमुख मान्यवर सहभागी झाले होते.