बेपत्ता माजी सैनिकाचं कुटुंब पोलिस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:06 AM2017-08-02T01:06:32+5:302017-08-02T01:06:32+5:30

Ex-servicemen's family police station missing | बेपत्ता माजी सैनिकाचं कुटुंब पोलिस ठाण्यात

बेपत्ता माजी सैनिकाचं कुटुंब पोलिस ठाण्यात

Next
ठळक मुद्देआढाव कुटुंबाला पाहण्यासाठी गर्दी
ोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खासगी सावकारीला कंटाळून घरातून निघून गेलेले माजी सैनिक राहुल आढाव हे पत्नी आणि दोन मुलींसह तब्बल २७ दिवसांनंतर मंगळवारी दुपारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. एवढे दिवस ते केरळमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत माहिती अशी की, क्षेत्रमाहुली येथील माजी सैनिक राहुल आढाव हे येथील तामजाईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा तेथे फ्लॅट आहे. एका व्यक्तीने बळजबरीने त्यांचा फ्लॅट घेतल्याचा आरोप करत त्यांनी ४ जुलैला घरात ‘सुसाईड नोट’ लिहून पत्नी स्वाती, मुली समृद्धी (वय १२), सिद्धी (वय ७) यांच्यासह घर सोडले. माजी सैनिकावर अशी वेळ आल्यामुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त होऊ लागला होता. त्यांच्या तपासासाठी शाहूपुरी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके तैनात केली होती. मात्र, आढाव कुटुंबाचा कोठेच थांगपत्ता लागत नव्हता.राहुल आढाव यांच्या आईनेही पोलिस अधीक्षक आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना भेटून मुलाचा तत्काळ शोध घ्यावा, अशी मागणी केली होती.दरम्यान, मंगळवारी दुपारी अडीच वाजता आढाव कुटुंबीय केरळपासून साताºयापर्यंत एका ट्रकने आले. महामार्गावर उतरल्यानंतर रिक्षाने सर्वजण शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. याची माहिती माजी सैनिक राहुल आढाव यांच्या आईला समजल्यानंतर त्या पोलिस ठाण्यात आल्या. नातींना पाहून त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. दोन्ही नाती आजीला बिलगल्या. हे दृष्य पाहून तेथे उपस्थित असलेल्यांनाही गहिवरुन आले. दरम्यान, या आढाव कुटुंबाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती.केरळमध्ये रेल्वे स्टेशनवर वास्तव्य!राहुल आढाव यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी गायब झाल्यापासूनचा सर्व दिनक्रम पोलिसांना सांगितला. ४ जुलैला त्यांनी दौंड येथून रेल्वेने थेट केरळ गाठले. जाताना वाटेमध्ये राहुल आढाव आणि त्यांच्या पत्नीने दोघांचेही मोबाईल फेकून दिले. केरळमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी मंदिर आणि रेल्वेस्टेशनचा आसरा घेतला. सकाळ आणि संध्याकाळी मंदिरात ते जेवण करत तर रात्री रेल्वे स्टेशनवर झोपायचे. असे त्यांच्या लहान मुलीने पोलिसांना सांगितले.आढाव यांच्याकडे सापडले आयकार्ड !राहुल आढाव हे बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांना त्यांच्या घरामध्ये एक आयकार्ड सापडले आहे. या आयकार्डवर ‘अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो’ असा उल्लेख आहे. हे आयकार्ड आढाव यांनी कशासाठी तयार केले आहे. त्यांचा या विभागाशी काय संबंध आहे का? याचा पोलिस तपास करणार आहेत.भात खाऊन काढले दिवसआढाव कुटुंबीय साताºयातून गायब झाल्यानंतर ते थेट केरळला गेले. पैसे जवळ नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. भुकेने व्याकूळ झालेल्या दोन लहान मुली सतत रडायच्या. त्यांना शांत करण्यासाठी त्यांना खाण्यासाठी भात देण्यात येत होता, असे पोलिसांनी सांगितले.पोलिस करणार उलट तपास!राहुल आढाव यांनी खासगी सावकारीच्या तगाद्याला कंटाळून घर सोडल्याचे पोलिसांना सांगितले असले तरी या प्रकरणातील वस्तूस्थिती वेगळीच असल्याचे समोर येत आहे. आढाव यांनी नोकरी लावतो, असे सांगून अनेकांकडून पैसे आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने आढाव यांच्याकडे पोलिस तपास करणार आहेत.

Web Title: Ex-servicemen's family police station missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.