पन्हाळ्यातील गेल्या ७० वर्षांपासून सुरू असलेले माजी सैनिक मुलांचे वसतिगृह बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:32+5:302021-06-29T04:16:32+5:30

सुमारे ६० मुलांना शिक्षणासाठी छत्रपती ताराराणी यांच्या राजवाड्याच्या एका भागात सुरू असलेल्या वसतिगृहात राहण्याची व जेवण्याची व्यवस्था या ठिकाणी ...

Ex-servicemen's hostel in Panhala closed for last 70 years | पन्हाळ्यातील गेल्या ७० वर्षांपासून सुरू असलेले माजी सैनिक मुलांचे वसतिगृह बंद

पन्हाळ्यातील गेल्या ७० वर्षांपासून सुरू असलेले माजी सैनिक मुलांचे वसतिगृह बंद

Next

सुमारे ६० मुलांना शिक्षणासाठी छत्रपती ताराराणी यांच्या राजवाड्याच्या एका भागात सुरू असलेल्या वसतिगृहात राहण्याची व जेवण्याची व्यवस्था या ठिकाणी होत होती; पण गेल्या दहा वर्षांपासून या वसतिगृहात माजी सैनिकांची मुले पाच ते सहा येऊ लागली. या मुलांसाठी प्रत्येकी ६०० रुपयेप्रमाणे दरमहा घेतले जात असत. बाकी सर्व खर्च सैनिक कल्याण बोर्ड व शासन करत असे. याठिकाणी माजी सैनिकांच्या मुलांशिवाय इतर मुलांनासुद्धा प्रवेश मिळत असे. त्यांच्याकडून दरमहा १८०० रुपये घेतले जात असत. बाकी खर्च महाराष्ट्र शासन करत असे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे हे वसतिगृह बंद आहे. या दरम्यान सैनिक बोर्ड व शासनाच्या आदेशानुसार वसतिगृहात पुरेशी मुले शिक्षणासाठी येत नसल्यास हे वसतिगृह बंद करण्याचा नियम निघाल्याने हे वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता हे वसतिगृह पन्हाळा विद्यामंदिरकडे हस्तांतर करण्यात येणार असल्याचे शिवाजी पवार यांनी सांगितले.

फोटो------- छ. ताराराणी यांच्या राजवाड्यातील माजी सैनिक मुलांचे बंद झालेले वसतिगृह.

Web Title: Ex-servicemen's hostel in Panhala closed for last 70 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.