कागलमध्ये ७५ विक्रेत्यांची तपासणी, एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:18 AM2021-05-28T04:18:45+5:302021-05-28T04:18:45+5:30
कागल शहरात रोज दहा ते वीस रुग्ण आढळत आहेत. नगरपालिका शिक्षण मंडळातील शिक्षक आणि पालिकेचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत ...
कागल शहरात रोज दहा ते वीस रुग्ण आढळत आहेत. नगरपालिका शिक्षण मंडळातील शिक्षक आणि पालिकेचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. पण रुग्णवाढीचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. रस्त्यावर भाजीपाला, फळे विक्री करणारे विविध दुकानदार यांच्यापासून तर हा फैलाव होत नसेल ना..म्हणून आज मुख्य बाजारपेठेत ही तपासणी करण्यात आली. पण, केवळ एकच पाॅझिटिव्ह आल्याने आता इतर ठिकाणी असा शोध घेतला जाणार आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचे पथक यासाठी नेमले आहे.
चौकट
शहरात या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६२८ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ३८६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर, १६ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित २२४ जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.