आरोग्य शिबिरात ८०० रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:24 AM2021-04-16T04:24:14+5:302021-04-16T04:24:14+5:30
रक्तदाब, मधुमेह, अस्थीरोग, आम्लपित्त, त्वचारोग, दमा, मूळव्याध, भगंदर, मुतखडा आदींसह स्त्री रोग, लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पाडळी ...
रक्तदाब, मधुमेह, अस्थीरोग, आम्लपित्त, त्वचारोग, दमा, मूळव्याध, भगंदर, मुतखडा आदींसह स्त्री रोग, लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पाडळी येथे सरपंच डॉ. विभा पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उदघाटन झाले.
यावेळी माजी सरपंच प्रकाश पाटील, रवींद्र पाटील, व्ही. बी. पाटील, धनाजी देसाई, अजित पाटील, श्रीधर पाटील, उदय पाटील, दिनकर पाटील, नितीन पाटील, महंमद पठाण, पद्मा पाटील उपस्थित होते.
अंबपवाडी येथे सरपंच पार्वती नाईक, कासारवाडी येथे शोभाताई खोत यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले.
डॉ. गिरीश कुमार, डॉ. सत्यजित माने, डॉ. प्रियांका माने यांनी रुग्णांची तपासणी केली.
फोटो : १५ नवे पारगाव शिबिर
ओळी-पाडळी येथे अशोकराव माने आयुर्वेदिक हॉस्पिटलच्यावतीने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन सरपंच डॉ. विभा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने, डॉ. गिरीश कुमार, प्रकाश पाटील, धनाजी देसाई, डॉ. सत्यजित माने, डॉ. प्रियांका माने उपस्थित होते.