ऑनलाइन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांची गुरुवारपासून परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:28+5:302021-04-12T04:21:28+5:30
विद्यापीठाने दि. २२ मार्चपासून हिवाळी सत्रातील परीक्षा सुरू केल्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने दि. ६ ते १२ एप्रिल ...
विद्यापीठाने दि. २२ मार्चपासून हिवाळी सत्रातील परीक्षा सुरू केल्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने दि. ६ ते १२ एप्रिल या कालावधीतील परीक्षा स्थगित केल्या. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सुमारे ५४ हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा देण्याचा पर्याय निवडला होता. कोरोनामुळे या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यासह ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्याय निवडावा, असे आवाहन केले. त्यानुसार काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पर्याय निवडला आहे. हा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा गुरुवारपासून होणार आहे. त्यामध्ये द्वितीय वर्ष बी.ए., बी.कॉम., बीएस्सी., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे.
ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी रविवारी दिली.