मुगळी येथे पाणंद रस्त्यावरील मातीचे उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:03+5:302021-04-16T04:23:03+5:30

तलाठी काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुगळी येथील ११२५ घनफूट जागेत मातीचे उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित माती कृष्णा ...

Excavation of soil on Panand Road at Mughli | मुगळी येथे पाणंद रस्त्यावरील मातीचे उत्खनन

मुगळी येथे पाणंद रस्त्यावरील मातीचे उत्खनन

Next

तलाठी काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुगळी येथील ११२५ घनफूट जागेत मातीचे उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित माती कृष्णा बयाप्पा नूलकर याने स्वत:चे घराच्या भरावासाठी वापरल्याचेही आढळून आले आहे. तसा अहवाल चंदगडचे तहसीलदारांना सादर करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, येथील मरगुबाई देवस्थानकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर उत्खनन झाल्याची माहिती काझी यांना मिळताच त्यांनी पथकासमवेत घटनास्थळाकडे भेट दिली. गटनंबर १०३ च्या लगत पाणंद रस्त्याचे वर नमूद उत्खनन नूलकरनी केले आहे. अधिक चौकशीअंती या मातीचा वापर नूलकरनी स्वत:च्या खासगी भराव कामाकरीता केल्याचेही स्पष्ट झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. संबंधितावर महसूल प्रशासनाकडून काय कार्यवाही होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष आहे.

माती उत्खननाची तलाठी साजिदा काझी, पोलीस पाटील संतू रेडेकर व कोतवाल तानाजी भोगण यांनी पंचनामा केला आहे.

-------------------------

फोटो ओळी : मुगळी (ता. चंदगड) येथील पाणंद रस्त्याचे बेकायदेशीर करण्यात आलेले माती उत्खनन.

क्रमांक : १५०४२०२१-गड-०६

Web Title: Excavation of soil on Panand Road at Mughli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.