दुधाळी प्खेडकर वगळता सर्व नवख्यांना गुलाल

By admin | Published: November 3, 2015 12:39 AM2015-11-03T00:39:07+5:302015-11-03T00:46:10+5:30

४८ जणांचे डिपॉझिट जप्त : शेखर कुसाळे, माधवी गवंडी, राहुल माने, सुनंदा मोहिते यांची बाजीॉव्हेलियन विभागीय कार्यालय

Except for a milk stick, all the husbands are gulal | दुधाळी प्खेडकर वगळता सर्व नवख्यांना गुलाल

दुधाळी प्खेडकर वगळता सर्व नवख्यांना गुलाल

Next

कोल्हापूर : दुधाळी पॅव्हेलियन विभागीय निवडणूक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभागातून शेखर कुसाळे (रंकाळा स्टँड), माधवी प्रकाश गवंडी (पंचगंगा तालीम), अनुराधा सचिन खेडकर (लक्षतीर्थ वसाहत), राहुल माने (बलराम कॉलनी), शोभा बोंद्रे (चंद्रेश्वर), सुनंदा मोहिते (सिद्धाळा गार्डन) यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर विजय मिळविला. खेडकरवगळता सर्व उमेदवार नवखे आहेत.
रंकाळा स्टँड (प्रभाग ४९)मधून ताराराणी आघाडीचे शेखर श्रीकांत कुसाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप जयसिंग माने यांचा ७५७ मतांनी पराभव केला. कुसाळे यांना १४७७, तर माने यांना ७२० मते पडली. शिवसेनेचे सचिन बिरंजे यांना ६७३ मते पडली. पंचगंगा तालीम (प्रभाग ५०) प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधवी प्रकाश गवंडी यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी वैशाली सतीश पाटील यांचा ९८२ मतांनी पराभव केला. गवंडी यांना १७७१, तर पाटील यांना ७८९ मते पडली. अन्य उमेदवारांत शारदा कळके यांना ७४४ व दीपा काटकर यांना ७४६ मते मिळाली. लक्षतीर्थ (प्रभाग ५१)मधून माजी नगरसेविका अनुराधा सचिन खेडकर यांनी नजीकच्या प्रतिस्पर्धी शिवानी संजय पाटील यांचा ६९३ मतांनी पराभव केला. खेडकर यांना २०८२, तर पाटील यांना १३८९ मते मिळाली. बलराम कॉलनी (प्रभाग ५२)मधून राहुल शिवाजीराव माने यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार गणेश रमेश खाडे यांचा ९०५ मतांनी पराभव केला. माजी नगरसेवक काँग्रेस नंदकुमार सूर्यवंशी यांना ८०० मते मिळाली.
सिद्धाळा गार्डन (प्रभाग ४६)मधून भाजपच्या उमेदवार सुनंदा सुनील मोहिते यांनी शिवसेनेच्या मंदा राजेंद्र पाटील यांचा ७३९ मतांनी पराभव केला. मोहिते यांना १४६५, तर पाटील यांना ७२६ मते मिळाली. अन्य उमेदवार कल्पना पाटील यांना ६७९ व वैशाली पाटील यांना ६८२ मते मिळाली.

दुधाळी कार्यालयाअंतर्गत प्रभागातील
४८ जणांचे डिपॉझिट जप्त
प्रभाग क्र. प्रभागाचे नावएकूण
३३महालक्ष्मी मंदिर४
४५कैलासगडची स्वारी५
४६सिद्धाळा गार्डन३
४८तटाकडील तालीम४
४९रंकाळा स्टँड६
५०पंचगंगा तालीम५
५१लक्षतीर्थ वसाहत३
५२बलराम कॉलनी३
५३दुधाळी पॅव्हेलियन४
५४चंद्रेश्वर५
५५पद्माराजे उद्यान६

Web Title: Except for a milk stick, all the husbands are gulal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.