आजरा तालुक्यात अतिवृष्टी, हिरण्यकेशी नदीचा बदलला प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 11:47 AM2021-05-17T11:47:12+5:302021-05-17T11:53:53+5:30

Cyclon Kolhapur : पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे, घाटकरवाडी परिसराला वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने रात्री झोडपले.

Excessive rainfall in Kitwade, Ghatkarwadi area of Ajra taluka | आजरा तालुक्यात अतिवृष्टी, हिरण्यकेशी नदीचा बदलला प्रवाह

आजरा तालुक्यात अतिवृष्टी, हिरण्यकेशी नदीचा बदलला प्रवाह

googlenewsNext
ठळक मुद्दे किटवडे बंधाऱ्याचे बरगे न काढल्यामुळे विद्युत पंप पाण्याखालीशेतकऱ्यांचे पंचवीस ते तीस लाखांवर नुकसान

सदाशिव मोरे

आजरा :  पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे, घाटकरवाडी परिसराला वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने रात्री झोडपले.

या परिसरात मे महिन्यात अतिवृष्टीपेक्षा जास्त म्हणजेच २८० मिलिमीटर पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रात्रीपासून या परिसरातून हिरण्यकेशी नदी धोक्‍याच्या पातळी बाहेरुन वाहत आहे.त्यामुळे हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यांना बरगे न काढल्यास धोका होवू शकतो.

किटवडे बंधाऱ्याची बरगे न काढल्यामुळे जवळपास १०० ते ११० विद्युतपंप पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या जमिनीमध्ये अंदाजे चार ते पाच फूट पाणी आहे.अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप व पाईप लाईन वाहून गेले आहेत. तर बंधाऱ्यातील पाणी अडवल्याने शेजारील शेती तुटून हिरण्यकेशी नदीने प्रवाह बदलला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अंदाजे २५ ते ३० लाखांवर नुकसान झाले आहे.

Web Title: Excessive rainfall in Kitwade, Ghatkarwadi area of Ajra taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.