पाण्याचा अतिवापर शेतीसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:13+5:302020-12-07T04:18:13+5:30

सेनापती कापशी : शेती हाच शाश्वत तरणोपाय आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा ...

Excessive use of water is dangerous for agriculture | पाण्याचा अतिवापर शेतीसाठी धोकादायक

पाण्याचा अतिवापर शेतीसाठी धोकादायक

Next

सेनापती कापशी : शेती हाच शाश्वत तरणोपाय आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पीक काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाण्याचा अतिवापर हा शेतीसाठी धोकादायक आहे. यामुळे जमीन नापीक होण्याची शक्यता आहे. याकरिता शेतकऱ्यांनी स्वयंचलित ठिबक यंत्रणेचा वापर करावा. त्यासाठी अनुदान मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीन, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

ते हसूर बुद्रुक (ता. कागल) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना यांच्यातर्फे आयोजित स्वयंचलित ठिबक प्रणाली, समर्थ कृषी पर्यटन व अंकुर फार्मासिस या शेती व्यवस्थापन ॲपच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जनरल मॅनेजर संजय शा. घाटगे, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर वाकुरे, अंकुर फार्मासिसचे गिरीश कुलकर्णी, आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी युवराज पाटील, शशिकांत खोत, अंकुश पाटील, ‘समन्यायी’चे आनंदराव पाटील, आदींसह कारखान्याचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतीवर प्रेम

मुश्रीफ म्हणाले, वडिलांच्या मृत्यूनंतर ५० एकर शेतीची जबाबदारी दहा वर्षे माझ्यावर होती. मी स्वतः हाडाचा शेतकरी आहे. शेतात मी वाकुरी मारलेली असून पाण्यासाठी नदीत खड्डेही खोदायचो. मी शेतीवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. अलीकडच्या काळात मला शेतात जाता येत नाही. माझ्या शेतीची जबाबदारी माझी पत्नी बघते.

फोटो : हसुर बुद्रुक (ता. कागल) येथे स्वयंचलित ठिबक, कृषी पर्यटन व शेती व्यवस्थापन ॲपचे लाँचिंग करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी भैया माने, युवराज पाटील, शशिकांत खोत, गिरीश कुलकर्णी, ज्ञानेश्वर वाकुरे, आदी उपस्थित होते.

Web Title: Excessive use of water is dangerous for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.