जुन्या वाहनांची देवाण-घेवाण थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:13+5:302021-08-26T04:25:13+5:30

कोल्हापूर : जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्री व्यवहारात वाहनांचे कायदेशीरपणे आरटीओतून मूळ मालकाच्या नावे हस्तांतरण, दुसऱ्याच्या नावे, बँक बोजा आदी हस्तांतरण ...

The exchange of old vehicles cooled down | जुन्या वाहनांची देवाण-घेवाण थंडावली

जुन्या वाहनांची देवाण-घेवाण थंडावली

googlenewsNext

कोल्हापूर : जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्री व्यवहारात वाहनांचे कायदेशीरपणे आरटीओतून मूळ मालकाच्या नावे हस्तांतरण, दुसऱ्याच्या नावे, बँक बोजा आदी हस्तांतरण करावयाचे झाल्यास मूळ मालकाच्या मोबाइलवर ओटीपी येतो. मात्र, मोबाइल बंद अथवा बदलल्यास व्यवहार करणे अडचणीचे बनले आहे.

कोरोना संसर्गाच्या सलग दोन लाटांमुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. आर्थिक अडचणींना बेरोजगारांना सामोरे जावे लागत आहे. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आपल्याकडील वाहन विकणे अथवा वैयक्तिक कर्ज घेणे असे मार्ग लोकांकडून अवलंबिले जात आहेत. नव्या वाहनांची खरेदीबरोबर जुन्या वाहनांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होते. विशेषत: दुचाकी आणि चारचाकी, दिवसाला ७०० ते ८०० इतके व्यवहार होतात. मात्र, ओटीपीच्या सक्तीमुळे या व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत वाहतूक संघटनेचे पदाधिकारी बाबा शिंदे यांनी परिवहन आयुक्तांशी याबाबत चर्चा केली. अशी सक्ती करू नये. याबाबत नियमात बदल करावा, अशी मागणी केली आहे.

ओटीपी फसवणुकीमुळे वाहनधारकांत घबराट

आपल्या मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक अन्य कोणाला दिल्यास आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे ओटीपी देण्यास अनेक जण टाळाटाळ करीत आहेत. जुने वाहन खरेदी व विक्रीत ओटीपी सक्तीमुळे दोन्ही बाजूंची अडचण झाली आहे.

कोट

ज्या त्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोबाइल क्रमांक अपडेट करण्यास परवानगी द्यावी. याबाबत वाहनधारकांचे प्रबोधन करावे, हस्तांतरण प्रणालीतील त्रुटी दूर कराव्यात. याबाबत परिवहन आयुक्तांशी चर्चा झाली. येत्या आठ दिवसांत यातील त्रुटी दूर करण्याचे त्यांनी मान्य केले आहे.

बाबा शिंदे, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन मालक चालक प्रतिनिधी संघटना (पुणे)

Web Title: The exchange of old vehicles cooled down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.