‘कोल्हापूर-मिरज’ रेल्वे मार्गाचा १३० वा वर्धापनदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:23 AM2021-04-22T04:23:02+5:302021-04-22T04:23:02+5:30
कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथे कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचा १३० वा वर्धापनदिन ...
कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथे कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचा १३० वा वर्धापनदिन बुधवारी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूर सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी संघटना आणि पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
स्टेशन प्रबंधक ए. आय. फर्नांडीस यांच्याहस्ते सकाळी अकराच्या सुमारास केक कापण्यात आला. रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि रेल्वे अभ्यासक मोहन शेटे यांनी कोल्हापूर संस्थानमधील रेल्वेचा इतिहास सांगितला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी ओळखून देशातील रेल्वे जाळ्याशी कोल्हापूर- मिरज रेल्वे मार्ग जोडून लोकहिताचे कार्य पार पाडले. कोल्हापूर संस्थानचा सर्वांगीण विकास व्हावा, औद्योगिक, व्यापार, सांस्कृतिक, कृषी आणि पर्यटन वाढावे या हेतूने त्यांनी कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाची सुरुवात केली असल्याचे मोहन शेटे यांनी सांगितले.
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे सचिव जयेश ओसवाल, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सुहास गुरव, अण्णासाहेब हरेल, रेल्वे विभागाचे सचिन पाटील, मनीषा तिग्गी आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.
फोटो (२१०४२०२१-कोल-रेल्वे वर्धापनदिन) :
कोल्हापुरात बुधवारी कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचा १३० वा वर्धापनदिन श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे प्रबंधक ए. आय. फर्नांडीस यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शेजारी सुहास गुरव, जयेश ओसवाल आदी उपस्थित होते.
===Photopath===
210421\21kol_2_21042021_5.jpg
===Caption===
फोटो (२१०४२०२१-कोल-रेल्वे वर्धापनदिन) : कोल्हापुरात बुधवारी कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाच्या १३० व्या वर्धापनदिन श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे प्रबंध ए. आय. फर्नांडीस यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शेजारी सुहास गुरव, जयेश ओसवाल, आदी उपस्थित होते.