चीअर गर्ल्स प्रकरणी कारवाईच्या भीतीने तरुणांमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:52+5:302020-12-12T04:39:52+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, गवशी पाटीलवाडी (ता. राधानगरी) येथील सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ दिनकर पाटील यांनी आपल्या मुलाच्या ...
याबाबत अधिक माहिती अशी की, गवशी पाटीलवाडी (ता. राधानगरी) येथील सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ दिनकर पाटील यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त भव्य रकमेचे बक्षीस असणाऱ्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत वेगळेपण येण्यासाठी त्यांनी ‘आयपीएल’च्या धर्तीवर सामन्यादरम्यान चौकार, षटकार मारल्यावर नाचण्यासाठी चीअर गर्ल्स आणल्या होत्या. यासाठी प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. चीअर गर्ल्स आणल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर तरुणांची गर्दी होऊन अनेक तरुणांनी या मुलीसोबत स्टेजवरून खाली ओढून गाण्याच्या तालावर डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यातीलच काहीजणांनी हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचवून कारवाईची मागणी केल्याने राधानगरी पोलिसांनी संयोजक रघुनाथ पाटील यांना बोलावून घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याचबरोबर या मुलीसोबत नाचणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ पाहून, ओळख पटवून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्यामुळे या तरुणांत खळबळ उडाली आहे.