‘आसमा चषक’ क्रिकेट स्पर्धेची उत्साहात सांगता

By admin | Published: March 29, 2015 10:11 PM2015-03-29T22:11:09+5:302015-03-30T00:26:02+5:30

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ‘लोकमत’च्या राहुल कांबळे याला गौरविण्यात आले.

In the excitement of 'Asma Cup' cricket competition | ‘आसमा चषक’ क्रिकेट स्पर्धेची उत्साहात सांगता

‘आसमा चषक’ क्रिकेट स्पर्धेची उत्साहात सांगता

Next

कोल्हापूर : अतिशय चुरशीने पार पडलेल्या आसमा क्रिकेट स्पर्धेची सांगता अत्यंत उत्साही वातावरणात झाली. या स्पर्धेत लोकमत, सकाळ, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, आसमा, बी न्यूज या संघांनी सहभाग घेतला होता.
शास्त्रीनगर मैदान येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम सामना ‘पुढारी’ व ‘सकाळ’ यांच्यात झाला. हा सामना ‘सकाळ’ने जिंकून आसमा चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले; तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ‘लोकमत’च्या राहुल कांबळे याला गौरविण्यात आले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी विजय रणदिवे, बिपीन मिरजकर, संजय रणदिवे, मोहन कुलकर्णी, अमरदीप पाटील, काका पाटील, राजाराम शिंदे, उदय दिवसे, उदय जोशी, कौस्तुभ नाबर, विवेक मंद्रूपकर, आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी विजयवाणी, बँक आॅफ महाराष्ट्र, खासदार धनंजय महाडिक, सतेज पाटील, ज्योतिरादित्य इस्टेट डेव्हलपर्स, जी. एस. चहा, महेंद्र ज्वेलर्स, पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, युनियन बँक आॅफ इंडिया, एस. एस. कम्युनिकेशन्स, एल. जी., व्यंकटेश्वरा गारमेंट्स, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली अर्बन बँक, रावसाहेब वंदुरे, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, गगन टुरिझम, कऱ्हाड अर्बन बँक, मालू गु्रप, शाहू दूध, स्टडी सर्कल, कुंभी-कासारी बँक, महालक्ष्मी बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, प्रताप कोंडेकर, पंचगंगा बँक, ट्रेड विंग्ज, आदित्य क्लिक टेक्नॉलॉजी, यशोधन क्लासेस यांचे सहकार्य लाभले.


‘लोकमत’चा राहुल कांबळे सर्वोत्कृष्ट फलंदाज

Web Title: In the excitement of 'Asma Cup' cricket competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.