मलकापूर येथील धोपेश्वर यात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:46 AM2021-03-13T04:46:02+5:302021-03-13T04:46:02+5:30

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री धोपेश्वराची यात्रा उत्साहात पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

Excitement of Dhopeshwar Yatra at Malkapur | मलकापूर येथील धोपेश्वर यात्रा उत्साहात

मलकापूर येथील धोपेश्वर यात्रा उत्साहात

Next

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री धोपेश्वराची यात्रा उत्साहात पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता कोरोनाचे सर्व नियम पाळत पन्नास भविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडला.

कासार्डे - जावली येथील ग्रामदैवत असलेल्या श्री धोपेश्वराची यात्रा भविकांविना पार पडली. सकाळी पुजारी मधुकर जंगम, नागेश जंगम यांच्या हस्ते धोपेश्वराच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक पुजाऱ्याच्या हस्ते घालण्यात आला. गुरुवारी पालखी मलकापुरातून धोपेश्वर मंदिरात नेण्यात आली. शुक्रवारी दुपारी मान मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.

यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नाना तोलके, पोलीसपाटील सर्जेराव चौगुले, दगडू पाटील, सरपंच यशवंत पाटील, उपसरपंच चंद्रकात तोलके, तुकाराम पाटील, आनंदा पाटील, सुनील पाटील, संतोष वरेकर, संतोष कांबळे, संतोष लंबोरे, बाबू जानकर, केशव पाटील, दत्ताराम भिलारे.

फोटो

कासार्ड - जावली येथील ग्रामदैवत श्री धोपेश्वराच्या यात्रेनिमित्त काढण्यात आलेली पालखी मिरवणूक.

Web Title: Excitement of Dhopeshwar Yatra at Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.