जयसिंगपूर रोटरी क्लबचे पदग्रहण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:36+5:302021-07-17T04:20:36+5:30

जयसिंगपूर : येथील रोटरी क्लबचा पदग्रहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पदग्रहण अधीक्षक म्हणून साताऱ्याचे इस्माईल पटेल हे प्रमुख ...

Excitement of Jaisingpur Rotary Club | जयसिंगपूर रोटरी क्लबचे पदग्रहण उत्साहात

जयसिंगपूर रोटरी क्लबचे पदग्रहण उत्साहात

Next

जयसिंगपूर : येथील रोटरी क्लबचा पदग्रहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पदग्रहण अधीक्षक म्हणून साताऱ्याचे इस्माईल पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरी संस्थेला मदत केल्याबद्दल अतिक पटेल, उद्योगपती संजय घोडावत, राजेश सानिकोप यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इस्माईल पटेल यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष राजकुमार बलदवा व सचिव अभय बनजवाडे तसेच ट्रेझरर सागर आडगाणे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला.

अध्यक्ष बलदवा यांनी या वर्षात बालवाडी इमारत वाढवून गरीब विद्यार्थ्यांसाठी वर्ग वाढविणार असल्याचे सांगितले. यावेळी वसुंधरा कोले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉ. नीता माने, सचिव शरद चौगुले, मोनिका बलदवा, नितीन शेट्टी, नागनाथ बसुदे, नारायण बलदवा, सुभाष चौधरी, रमेश इंगळे, विनोद घोडावत, राजेंद्र मालू, राजेंद्र पाटील, राजेश सानिकोप, संजय माणगावे, शिवराज पाटील यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Excitement of Jaisingpur Rotary Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.