भीम फेस्टिव्हलचे उद्घाटन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:52+5:302021-04-12T04:21:52+5:30
कोल्हापूर : माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारपासून आयोजित केलेल्या भीम फेस्टिव्हल-२०२१ ...
कोल्हापूर : माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारपासून आयोजित केलेल्या भीम फेस्टिव्हल-२०२१
चे माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यानिमित्त बिंदू चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्यप्रदेश येथील महू येथे ज्या घरात जन्म झाला त्या घराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. दरवर्षी फाउंडेशनच्या वतीने ११ ते १४ एप्रिलपर्यंत भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, आरपीआयचे नेते उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, दगडू भास्कर, आदी मान्यवरांनी भेट दिली व महापुरुषांना अभिवादन केले.
प्रा. डॉ. अक्षता गावडे यांचे 'भारतीय संविधान व आजची स्थिती' या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले. प्रास्ताविक धोंडीराम कांबळे यांनी केले. यावेळी फाउंडेशनचे सदानंद डिगे, विकी माजगावकर, बाळासाहेब भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : ११०४२०२१-कोल-डिगे फौंडेशन
आेळी : बिंदू चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारपासून माजी खासदार एस.के. डिगे फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या भीम फेस्टिव्हलचे उद्घाटन माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते झाले.