Kolhapur: जिवावर बेतणारे सेल्फी, फोटोसेशनचा स्टंट; पन्हाळगडावर पर्यटकांचे धोकादायक प्रकार वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 03:59 PM2024-07-05T15:59:07+5:302024-07-05T15:59:25+5:30

नितीन भगवान  पन्हाळा : दोन आठवड्यापुर्वी पन्हाळगडावर उंच कड्यावरुन एक तरुण सेल्फी घेताना पायघसरुन खाली पडल्याची घटना समोर आली. ...

Exciting selfies, photoshoot stunts; Dangerous types of tourists have increased at Panhalgad kolhapur | Kolhapur: जिवावर बेतणारे सेल्फी, फोटोसेशनचा स्टंट; पन्हाळगडावर पर्यटकांचे धोकादायक प्रकार वाढले

Kolhapur: जिवावर बेतणारे सेल्फी, फोटोसेशनचा स्टंट; पन्हाळगडावर पर्यटकांचे धोकादायक प्रकार वाढले

नितीन भगवान 

पन्हाळा : दोन आठवड्यापुर्वी पन्हाळगडावर उंच कड्यावरुन एक तरुण सेल्फी घेताना पायघसरुन खाली पडल्याची घटना समोर आली. सुदैवाने हा तरुण बचावला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे सेल्फीचा मोह या तरुणाला महागात पडला त्याला जीवाला मुकण्याची वेळ आली होती. पन्हाळगडावरील तटबंदी, कड्यालगत उभे राहुन जीव धोक्यात घालत फोटोसेशन, सेल्फी करण्याची स्टंटबाजी जीवघेणी ठरत आहेत.

उन्हाळा, हिवाळा व पावसाळा पन्हाळ्यातील  वातावरण आल्हाददायक असते. यामुळे पन्हाळगडावर कायमच पर्यटकांची गर्दी असते. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी तर गडावर पर्यटकांची रीघ असते. निसर्गाच्या सानिध्यात जात असताना त्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी प्रत्येकजण आतुरलेला असतो. मात्र या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने जीवावर बेतणारे प्रसंगही घडत आहेत. त्यामुळे भान हरपून निसर्ग कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात अनेकांना जीवाला मुकण्याची वेळ आल्यावरच शहाणपणा येणार काय असा प्रश्न आहे.

विविध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्टंटबाजी केल्याने अनेक युवकांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना समोर येत आहेत. पन्हाळ्यावर सध्या पावसाला सुरुवात झाल्याने येथील घनदाट धुके, थंडगार वारा आणि पावसाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. धोकादायक ठिकाणी बेभान होऊन थ्रील करत सेल्फी करण्यात तरुण मग्न होत आहेत. अंधारबाव ते तीनदरवाजा दरम्यान असलेल्या कठड्यावर उभे राहुन तरुणाई आपल्या मित्रासमवेत सेल्फी, फोटोसेशन करताना करत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे निसर्ग कॅमेऱ्यात कैद करताना स्टंटबाजीमुळे दवाखान्याची पायरी चढु नका असे आवाहन पन्हाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे व नगरपरिषद मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी केले आहे. 

पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे 

पन्हाळ्यासह परिसरातील मसाईपठार येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. येथील तटबंदीवर दरीच्या बाजुने सेल्फी, फोटोसेशन करणे धोकादायक असुन संरक्षणासाठी तेथे कठडे नाहीत, पावसामुळे प्रचंड निसरडे झाले आहे. पण पर्यटक कोणतीही काळजी घेत नाहीत. याठिकाणी लोकवस्ती नसल्याने अपघात की घातपात असाच समज होणार आहे. त्यामुळे स्टंटबाजी करताना पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Web Title: Exciting selfies, photoshoot stunts; Dangerous types of tourists have increased at Panhalgad kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.