वीज बिल माफ करा- नॅशनल सोशालिस्ट पार्टीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:57 AM2021-01-13T04:57:35+5:302021-01-13T04:57:35+5:30

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे नागरिकांना उद्याेगधंदा नसल्याने वीज बिल भरता आलेले नाही. या काळात कमी वीज वापरुनही भरमसाठ बिले आली ...

Excuse the electricity bill- National Socialist Party demand | वीज बिल माफ करा- नॅशनल सोशालिस्ट पार्टीची मागणी

वीज बिल माफ करा- नॅशनल सोशालिस्ट पार्टीची मागणी

Next

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे नागरिकांना उद्याेगधंदा नसल्याने वीज बिल भरता आलेले नाही. या काळात कमी वीज वापरुनही भरमसाठ बिले आली असून, मोलमजुरी करणाऱ्या कामगारांचे बिल माफ व्हावे, अशी मागणी नॅशनल सोशालिस्ट पार्टीने केली आहे. यासाठी सोमवारी धरणे आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, आधीच कोरोनामुळे नागरिक आर्थिक अडचणीत असल्याने वीज बिल भरता आलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील छोट्या उद्योजकांच्या वीज बिलात सवलत मिळावी, विनापरवाना वीज कनेक्शन बंद केलेल्या ग्राहकांना स्थिर आकारसह वीज बिल येत आहे. ती बेकायदेशीर वीज बिले माफ व्हावीत. यावेळी जिल्हाध्यक्ष शरणाप्पा हळीजोळ, यशवंतराव शेळके, पियुष पाटील, अविनाश मुळीक, चंद्रकला पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

--

फोटो नं ११०१२०२१-कोल-सोशॅलिस्ट पार्टी

ओळ : सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्यावतीने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हावे, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

-

Web Title: Excuse the electricity bill- National Socialist Party demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.