वरद खून प्रकरणातील आरोपीला फाशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:55+5:302021-08-29T04:24:55+5:30
म्हाकवे : सोनाळी येथील वरदच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, अशी ...
म्हाकवे : सोनाळी येथील वरदच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. शिवानी विजयसिंह भोसले यांनी केली आहे. मागणीचे निवेदन मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे दिले.
वरदसारख्या निष्पाप बालकावर यापुढे अन्याय करण्याचे धाडस कोणीही करणार नाही. यासाठी वरदच्या खुन्याला फाशीचीच शिक्षा योग्य असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे. यावेळी जयवंतराव पाटील (कुरुकली), विवेक कांबळे, सचिन वाडकर,शुभम चौगुले (बेनिक्रे)
२८ म्हाकवे शिवानी भोसले
कॅप्शन : वरदचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन देताना जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, यावेळी जयवंत पाटील, सचिन वाडकर, शुभम चौगले आदी.