आईच्या शरीराचे तुकडे करून खून करणाऱ्यास फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:09+5:302021-07-09T04:17:09+5:30

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचे तुकडे करून क्रूरपणे खून करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग-४) ...

Execution of the murderer by dismembering the mother's body | आईच्या शरीराचे तुकडे करून खून करणाऱ्यास फाशी

आईच्या शरीराचे तुकडे करून खून करणाऱ्यास फाशी

Next

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचे तुकडे करून क्रूरपणे खून करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग-४) महेश कृष्णाजी जाधव यांनी गुरुवारी मरेपर्यंत फाशीची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुनील रामा कुचकोरवी (वर ३५, रा. माकडवाला वसाहत, ताराराणी चौक, कोल्हापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. चार वर्षांपूर्वी कोर्याची परिसीमा गाठणारा हा प्रकार घडला होता. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेच्या खटल्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले.

खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, ताराराणी चौकातील माकडवाला वसाहतीत राहणारा सुनील कुचकोरवी याने दि. २८ ऑगस्ट २०१७ रोजी, दारूला पैसे दिले नाहीत म्हणून स्वत:ची आई यल्लवा कुचकोरवी (वय ६२) हिच्या शरीराचे चाकू, सुरी, सत्तूरने तुकडे करून तिची निर्दयीपणे हत्या केली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना केली होती. तो पळून जाताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्याच्याविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केला. खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग ४) महेश कृष्णाजी जाधव यांच्या न्यायालयात सुरू होते. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. खटल्यात एकूण ३४ पैकी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुराव्यावरून व दोन्ही बाजूच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सुनीलला दि. ३० जून रोजी दोषी ठरवले. त्याला जन्मठेप की फाशीची शिक्षा याबाबत दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला होता. गुरुवारी सकाळी ११ वाजता सुनावणीस प्रारंभ झाला. अवघ्या ४५ मिनिटांत न्यायमूर्ती जाधव यांनी, आरोपी सुनीलने केलेले कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे असल्याचे नमूद करून भादवि स. ३०२ नुसार त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

जिल्ह्यात फाशीच्या शिक्षेचे दुसरी घटना

२००१ मध्ये कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात गाजलेला अंजनाबाई गावित बालके हत्याकांड प्रकरणात न्यायमूर्ती जी. एल. येडके यांनी सीमा गावित व रेणुका गावित-शिंदे या दोघी सख्ख्या बहिणींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी आईच्या हत्याप्रकरणी सुनील कुचकोरवी याला जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

आई, मुलांचा अक्रोश

निकालाची सुनावणी सुरू असताना आरोपीची पत्नी, लहान मुलगी व मुलगा तसेच मोजकेच नातेवाईक न्यायालयाबाहेर उभे होते. निकाल समजल्यानंतर त्याना रडू कोसळले.

कडेकोट पोलीस बंदोबस्त..

न्यायालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. पक्षकार व वकिलांची तुरळक गर्दी होती. त्याचवेळी नातेवाइकांच्या समोरच आरोपी सुनील कुचकोरवी याला पोलीस बंदोबस्तात आणले. न्यायालयात शिक्षा सुनावताना आरोपी हात जोडून उभा होता.

कोट..

खाटीक प्राण्याची हत्या करतो, त्याप्रमाणे आरोपीने हत्याराने आईची हत्या केली. नऊ महिने पोटात सांभाळले. दोन वर्षे दूध पाजले, त्या आईची निर्दयीपणे हत्या केली. कौर्याची परिसीमा गाठली. समाजाला न रुचणारी घटना असल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा पुरेशी नाही म्हणून मरेपर्यंत फाशीची शिक्षा योग्यच आहे. - महेश जाधव, जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोल्हापूर

कोट...

आरोपीने स्वत:च्या आईची निर्दयीपणे हत्या करून मृतदेहाची विटंबना केली, ही मन हेलावून टाकणारी घटना आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, समाजावर जरब बसविणे उपयुक्तच होते. त्यादृष्टीने खटला प्रारंभपासूनच आपल्याकडे ठेवून लढलो. - ॲड. विवेक शुक्ल, सरकरी अभियोक्ता, कोल्हापूर

फोटो नं.०८०७२०२१-कोल-सुनील कुचकोरवी (कोर्ट-आरोपी)

फोटो नं.०८०७२०२१-कोल- ॲड. विवेक शुक्ल (कोर्ट-ॲडव्होकेट)

फोटो नं.०८०७२०२१-कोल- संजय मोरे(कोर्ट-पोलीस इन्स्पेक्टर)

फोटो नं.०८०७२०२१-कोल-कोर्ट०१

ओळ : आरोपीला फाशीची शिक्षा सुनावताच न्यायालयाच्या इमारतीबाहेर उभारलेली त्याची पत्नी व दोन मुलांना रडू कोसळले. (छाया : नसीर अत्तार)

080721\08kol_9_08072021_5.jpg

फोटो नं.०८०७२०२१-कोल-सुनिल कुचकोरवी (कोर्ट-आरोपी)फोटो नं.०८०७२०२१-कोल- ॲड. विवेक शुक्ल (कोर्ट-ॲडव्होकेट)फोटो नं.०८०७२०२१-कोल- संजय मोरे(कोर्ट-पोलीस इन्पेक्टर)फोटो नं.०८०७२०२१-कोल-कोर्ट०१ओळ : आरोपीला फाशीची शिक्षा सुनावताच न्यायालयाच्या इमारतीबाहेर उभारलेली त्याची पत्नी व दोन मुलांना रडू कोसळले. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Execution of the murderer by dismembering the mother's body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.