वाढत्या खर्चावर एका बैलाचा ‘उतारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:58+5:302021-02-09T04:25:58+5:30

म्हाकवे : बैलजोडीची वाढती किंमत, त्यांचा वाढता व्यवस्थापन खर्च यामुळे बैलजोडी परवडत नाही, तर यांत्रिकीकरणाद्वारे करण्यात येणाऱ्या ...

'Exemption' of a bull at rising cost | वाढत्या खर्चावर एका बैलाचा ‘उतारा’

वाढत्या खर्चावर एका बैलाचा ‘उतारा’

Next

म्हाकवे : बैलजोडीची वाढती किंमत, त्यांचा वाढता व्यवस्थापन खर्च यामुळे बैलजोडी परवडत नाही, तर यांत्रिकीकरणाद्वारे करण्यात येणाऱ्या मशागतीचे दरही प्रचंड वाढले आहेत. याला पर्याय म्हणून आणूर (ता. कागल) येथील शेतकऱ्यांनी एकाच बैलांवर अवलंबून असणाऱ्या मशागत अवजारांची निर्मिती केली आहे. यापूर्वी केवळ एका बैलाचा वापर एक्का गाडीसाठी होत होता.

ऊस भरणीसाठी रोटावेटर, ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यासाठी प्रतिगुंठा १२० ते १४०पर्यंत दर आहे. त्यामुळे हे न परवडणारे आहे. परिणामी एकाच बैलांवर आधारित नांगरणी, बांडगे मारण्याची अवजारे तयार केली आहेत. यामुळे व्यवस्थापन खर्चात कमालीची घट होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, मशागतीची कामे नसेल तेव्हा एक्क्यातून वैरण किंवा अन्य शेतीमाल ने-आण करण्यासाठी या बैलाचा वापर होतो.

कोट....

ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे दर गगनाला भिडले आहेत, तर बैलजोडी सांभाळणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे हा पर्याय शोधला आहे. केवळ जमिनीमध्ये मशागत योग्य वापसा (घात) असायला हवी. महादेव माने,

शेतकरी, आणूर

कॅप्शन आणूर येथे एकाच बैलाच्या साहाय्याने मशागत करताना शेतकरी

छाया - दत्तात्रय पाटील

Web Title: 'Exemption' of a bull at rising cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.