कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांची जगण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:25 AM2021-05-13T04:25:20+5:302021-05-13T04:25:20+5:30

महागाईची ‘फोडणी ’ गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत सध्या ७८ ते १०० रूपयांनी तेलाच्या दरामध्ये प्रतिकिलो वाढ झाली आहे. मागील ...

Exercise for the survival of the fittest in the Corona epidemic | कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांची जगण्याची कसरत

कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांची जगण्याची कसरत

Next

महागाईची ‘फोडणी ’

गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत सध्या ७८ ते १०० रूपयांनी तेलाच्या दरामध्ये प्रतिकिलो वाढ झाली आहे. मागील वर्षी ८८ ते ९० रूपये असलेल्या सरकी तेलासाठी सध्या १८६ रूपये मोजावे लागत आहेत. १२० रूपयांवरील शेंगदाणा तेल १९८ रूपयांवर, तर १०० रूपयांचे सूर्यफूल तेल २०० रूपयांवर पोहोचले आहे. ८८ रूपये असणारे सोयाबीन तेल १६५ रूपये,तर ८० ते ८२ रूपयांचे पामतेल १५० रूपये झाले आहे. नोव्हेंबर २०२० पासून खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ, पाश्चात्य देशांनी वाढविलेला निर्यात कर आणि उत्पादन कमी असल्याने दर वाढले असल्याचे तेल विक्रेते केतन तवटे यांनी सांगितले.

चौकट

दरवाढीने ‘डाळ’ शिजेना

गेल्या वर्षी ८५ ते ९० रूपये प्रतिकिलो असणारी तूर डाळ १०० ते १२० रूपये, ६५ रूपयांची हरभरा डाळ ७५ रूपये, १०० रूपयांची मूग डाळ ११६ रूपये, ८० रूपयांची मसूर डाळ ८८ रूपये, १२० रूपयांची मटकी १४० रूपये, १०० रूपयांची उडीद डाळ आणि पांढरा वाटणा १२० रूपये झाला आहे. इंधन दरवाढीमुळे डाळी आणि कडधान्याचे दर वाढले असल्याचे धान्य विक्रेते अनिल महाजन यांनी सांगितले.

Web Title: Exercise for the survival of the fittest in the Corona epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.