शिवराज हुल्लेन्नावर यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 06:25 PM2017-07-23T18:25:34+5:302017-07-23T18:25:34+5:30
सोलो लॅन्डस्केप : श्यामकांत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२३ : कर्नाटकातील कुडची येथील चित्रकार शिवराज हुल्लेन्नावर यांच्या सोलो लॅन्डस्केप चित्रांच्या प्रदर्शनास कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनच्या कलादालनात सुरवात झाली.
या प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, शिल्पकार आणि चित्रकार संजीव संकपाळ, चित्रकार आणि जीजेसी नेलामंगला बेंगलुरुचे कला शिक्षक आप्पासाहेब गणीगीर यांच्या उपस्थितीत झाले.
या कार्यक्रमास जेष्ठ चित्रकार शारदा आर्टसचे सुनील पंडित, धनंजय जाधव यांच्यासह कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिवराज हुल्लेन्नावर हे कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील कुडची येथील असून हम्पी येथील कन्नड विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी रेखाटलेल्या २४ हून अधिक कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या आहेत.
या प्रदर्शनात त्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या जलरंगातील लॅन्डस्केपमधून कर्नाटक, महाराष्ट्र परिसरातील देखण्या वास्तू आणि निसर्गस्थळांचे मनोहारी दर्शन घडते. हम्पी येथील सरस्वती मंदिर, रायबाग येथील शाहू महाराज पॅलेस, हम्पी येथील हजार राम मंदिर तसेच राम लक्ष्मण मंदिराची चित्रे मन मोहून घेतात. हे प्रदर्शन दिनांक २३ जुलैपासून २६ जुलै 2017 पर्यंत सकाळी १0 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.