आंबोली-दोडामार्गच्या राखीव जंगलात वाघाचे अस्तित्व स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:24 AM2021-04-01T04:24:05+5:302021-04-01T04:24:05+5:30

कोल्हापूर : सिंधुदुर्गातील ‘आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’ जंगलक्षेत्रात नर वाघाचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरात वाघाने मारलेल्या गव्याचे ...

The existence of tigers in the reserved forest of Amboli-Dodamarg is clear | आंबोली-दोडामार्गच्या राखीव जंगलात वाघाचे अस्तित्व स्पष्ट

आंबोली-दोडामार्गच्या राखीव जंगलात वाघाचे अस्तित्व स्पष्ट

Next

कोल्हापूर : सिंधुदुर्गातील ‘आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’ जंगलक्षेत्रात नर वाघाचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरात वाघाने मारलेल्या गव्याचे कुजलेले शरीर आढळले असून, त्याच्या पावलांच्या ठशावरुन हा पूर्णवाढीचा नर वाघ असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. ‘आंबोली-दोडामार्ग’ हे जंगलक्षेत्र नव्याने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर प्रथमच या भागात वाघाचा अधिवास असल्याचे समोर आले आहे.

आंबोलीत यापूर्वीही वाघांच्या पावलांचे ठसे आणि त्याने केलेल्या शिकारीचे अवशेष मिळाले होते. लाॅकडाऊनमध्येही आंबोली परिसरात वाघाने म्हशीची शिकार केली होती. दोन दिवसांपूर्वी ‘आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये वाघाने केलेली गव्याची शिकार आणि वन कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान वाघाच्या पावलाचे ठसे सापडल्याने आंबोलीपासून आजरा जंगलक्षेत्रात नर वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याचे कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही. बेन क्लेमेंट यांनी सांगितले आहे.

कोट

आंबोली, दोडामार्ग, तिलारी या जंगल क्षेत्राला राखीव संवर्धन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे वाघांचा भ्रमणमार्ग संरक्षित झाला तसेच तो सलग जोडला गेल्यामुळे या परिसरात वाघांच्या हालचाली दिसत आहेत. हा चांगला परिणाम या वाघाच्या अस्तित्वामुळे दिसून आला आहे.

- डाॅ. व्ही. बेन क्लेमेंट,

मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर.

वाघांच्या सलग भ्रमणमार्ग ठरतोय उपयुक्त

वन्यजीव मंडळाच्या शिफारशीवरुन डिसेंबर, २०२०मध्ये राज्य सरकारने ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या ‘आंबोली-दोडामार्ग’ आणि २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील चंदगड तालुक्यातील जंगलक्षेत्र संरक्षित करुन त्याला ‘कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’ म्हणून राखीव केले होते. तसेच याला जोडून असलेल्या २९.५३ चौरस किलोमीटरचे तिलारी जंगलक्षेत्रही राखीव संवर्धन म्हणून संरक्षित केले होते. तीन राज्यांच्या सीमेवरील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्र हे ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’साठी अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. गोव्यातील म्हादई अभयारण्य आणि कर्नाटकातील भीमगड अभयारण्य क्षेत्रही याला जोडलेले असल्याने वन्यजीवांच्या विशेषत: वाघांच्या भ्रमणमार्गाकरिता विशेषत: वाघांच्या प्रजननाकरिता हा सलग पट्टा उपयुक्त ठरला आहे. आता वाघांच्या हालचाली आंंबोली, चंदगड, आजरा, राधानगरी आणि चांदोली अभयारण्यापर्यंत आढळण्याची शक्यता आहे.

--------------------------------------------------------

फोटो : ३१०३२०२१-कोल-दोडामार्ग टायगर०१/०२ /०३/०४

दोडामार्ग परिसरात वाघाने केलेल्या गव्याच्या शिकारीचे अवशेष.

===Photopath===

310321\31kol_1_31032021_5.jpg~310321\31kol_4_31032021_5.jpg~310321\31kol_5_31032021_5.jpg

===Caption===

फोटो : ३१०३२०२१-कोल-दोडामार्ग टायगर०१दोडामार्ग परिसरात वाघाने केलेल्या गव्याच्या शिकारीचे अवशेष.~फोटो : ३१०३२०२१-कोल-दोडामार्ग टायगर०२दोडामार्ग परिसरात वाघाने केलेल्या गव्याच्या शिकारीचे अवशेष.~फोटो : ३१०३२०२१-कोल-दोडामार्ग टायगर०३दोडामार्ग परिसरात वाघाने केलेल्या गव्याच्या शिकारीचे अवशेष.

Web Title: The existence of tigers in the reserved forest of Amboli-Dodamarg is clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.