वीरशैव रुद्रभूमी कामासाठी अपेक्षित निधी देऊ : नगरविकास मंत्री शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:45+5:302021-01-10T04:17:45+5:30
वीरशैव लिंगायत समाजाच्या जुन्या बुधवार पेठ, सिध्दार्थनगर परिसरात साडेतीन एकर जागेभोवती संरक्षक भिंत बांधणे, परिसर सुशोभीकरण, प्रखर प्रकाशाचे दिवे, ...
वीरशैव लिंगायत समाजाच्या जुन्या बुधवार पेठ, सिध्दार्थनगर परिसरात साडेतीन एकर जागेभोवती संरक्षक भिंत बांधणे, परिसर सुशोभीकरण, प्रखर प्रकाशाचे दिवे, अंतर्गत रस्ते, आदी कामांसाठी साडेतीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम लोकवर्गणीतून वसूल करणे अशक्य आहे. त्यासाठी राज्य सरकारने या कामास सहकार्य करावे, अशी मागणी समाजाच्या शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, उपाध्यक्ष चंद्रकांत स्वामी, राजू वाली, ॲड. सतीश खोतलांडे, नानासाहेब नष्टे, वसंतराव सांगावकर, राजेश पाटील, चंदूरकर, सुहास भेंडे, सुभाष चौगुले, व्यवस्थापक बी. एस. पाटील, महेश नष्टे, आर. एस. हिरेमठ उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०९०१२०२१-कोल-रुद्रभूमी
ओळ - कोल्हापूर शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या रुद्रभूमी विकासकामास निधी द्यावा या मागणीचे निवेदन समाजातर्फे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. यावेळी राजेश क्षीरसागर, सुनील गाताडे, राजू वाली उपस्थित होते.