नगराध्यक्षपदाला खर्चमर्यादा १० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 12:29 AM2016-10-25T00:29:13+5:302016-10-25T01:08:35+5:30

नगरपालिका निवडणूक : ‘अ’वर्गसाठी १० लाख, ‘ब’ वर्गसाठी ७ लाख ५० हजार, ‘क’ वर्ग ५ लाख

Expenditure limit of 10 lakh | नगराध्यक्षपदाला खर्चमर्यादा १० लाख

नगराध्यक्षपदाला खर्चमर्यादा १० लाख

Next

प्रवीण देसाई -- कोल्हापूर --जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी १० लाख रुपयांपर्यंत, ‘ब’ वर्गसाठी ७ लाख ५० हजार रुपये व ‘क’ वर्गसाठी ५ लाख रुपये अशी निवडणूक खर्चाची मर्यादा दिली आहे. हा खर्च उमेदवारांकडून सोमवार (दि.२४) पासून गृहीत धरला जाणार आहे.
उमेदवारी अर्ज भरायला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. या दिवसापासून उमेदवारांचा खर्च धरला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदासाठी स्वतंत्रपणे खर्च मर्यादा दिली आहे. नगराध्यक्षपदासाठी ‘अ’ वर्ग नगरपालिकेकरिता १० लाख रुपयांपर्यंत, ‘ब’ वर्गसाठी ७ लाख ५० हजार रुपये व ‘क’ वर्गसाठी ५ लाख रुपये अशी खर्चाची मर्यादा दिली आहे.
नगरसेवकांसाठी ‘अ’ वर्ग नगरपालिकेसाठी ३ लाख रुपये, ‘ब’ वर्गसाठी अडीच लाख रुपये व ‘क’ वर्गसाठी दीड लाख रुपये खर्चाची मर्यादा राहणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार व नगरसेवकपदासाठीचे उमेदवार वर्गनिहाय नगरपालिकांना ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपर्यंत खर्च करू शकतात.


‘अ’ वर्ग नगरपालिका
इचलकरंजी.
‘ब’ वर्ग नगरपालिका
जयसिंगपूर.
‘क’ वर्ग नगरपालिका
वडगाव, कुुरुंदवाड, मलकापूर, पन्हाळा, गडहिंंग्लज, कागल, मुरगूड.

Web Title: Expenditure limit of 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.