जयसिंगपूरमध्ये स्थानिक की महाविकास आघाडीचा प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:28 AM2021-08-24T04:28:05+5:302021-08-24T04:28:05+5:30

संदीप बावचे : जयसिंगपूर जयसिंगपूर नगरपालिकेत स्थानिक आघाड्या की महाविकास आघाडीचा प्रयोग होणार, याबाबत आतापासूनच उत्सुकता आहे. पालिकेवर एकहाती ...

Experiment of local key development front in Jaysingpur! | जयसिंगपूरमध्ये स्थानिक की महाविकास आघाडीचा प्रयोग!

जयसिंगपूरमध्ये स्थानिक की महाविकास आघाडीचा प्रयोग!

Next

संदीप बावचे : जयसिंगपूर

जयसिंगपूर नगरपालिकेत स्थानिक आघाड्या की महाविकास आघाडीचा प्रयोग होणार, याबाबत आतापासूनच उत्सुकता आहे. पालिकेवर एकहाती सत्ता आणण्यासाठी सत्ताधारी शाहू आघाडीचा प्रयत्न राहणार आहे. तर गेल्या साडेचार वर्षात विरोधी ताराराणी आघाडीत एकमत नसल्याने पालिकेच्या राजकारणात फारसा प्रभाव दिसला नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी नेमकी कोणती आघाडी पुढे येणार, यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे.

गत निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत शाहू आघाडीविरुध्द भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना पुरस्कृत ताराराणी आघाडी असा सामना झाला होता. नगराध्यक्षपद ताराराणी आघाडीला तर शाहू आघाडीने बहुमत मिळविले.

गेल्या अनेक निवडणुकांप्रमाणे यंदाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गटाचे प्राबल्य पालिका सभागृहात राहील, अशी व्यूहरचना केली जात आहे. तरीही राज्यात सत्तेपासून दूर असलेला भाजप, शिवेसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या भूमिका विरोधी आघाडीच्या अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार आहेत. गतवेळच्या ताराराणी आघाडीला माजी आमदार महादेवराव महाडिक यांची रसद होती.

दरम्यान, गेल्या साडेचार वर्षात विरोधी ताराराणी आघाडीतच बिघाडी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. या आघाडीचा प्रभाव फारसा दिसून आला नाही. त्यामुळे सत्ताधारी आघाडीला रोखण्यासाठी कोणती आघाडी पुढे येणार, यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह असलेतरी भाजपाने शहरात चाचपणी सुरू केली आहे. राज्यमंत्री पदामुळे यड्रावकर गटाची राजकीय ताकद वाढली आहे. विरोधी गट कमी करण्यातदेखील यड्रावकर यशस्वी ठरले आहेत.

एकसदस्यीय प्रभाग रचनेमुळे अपक्षांची गर्दी होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी आघाड्यांची डोकेदुखी वाढणार आहे. एकूणच पालिका निवडणुकीत पुन्हा स्थानिक आघाड्याच की महाविकास आघाडीचा प्रयोग होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

----------------------

७९ वर्षांची नगरपालिका

* ७ कोटी वार्षिक उत्पन्न

* ४७ हजार २५३ एकूण मतदार

चौकट - सभागृहातील सध्याचे बलाबल

शाहू आघाडी - १३ ताराराणी आघाडी - ०९ अपक्ष - ०२ -------------

चौकट - पाच वर्षांतील कामे

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा हस्तांतरणाला मंजुरी, शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी तरतूद, १० कोटी रुपये खर्चाच्या प्रशासकीय इमारतीचा पायाभरणी, दसरा चौकातील स्टेडियमचे सुशोभिकरण, पाणीपुरवठा जॅकवेलचे विस्तारीकरण, स्टेशन रोडवरील वॉकिंग ट्रॅक.

---------------

चौकट - घडले-बिघडले..!

*

संजय पाटील-यड्रावकर यांनी अनेकांची नाराजी कमी करून एकहाती सत्ता आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

* गेल्या दीड वर्षांपासून शहराच्या विकासासाठी शाहू व ताराराणी आघाडीचे नगरसेवक एकत्र आले आहेत.

* शाहू आघाडीने ताराराणी आघाडीला महिला बालकल्याण सभापतीपद दिले आहे.

* जयसिंगपूरला भाजपचा नगराध्यक्ष झाल्यास १०० कोटी निधी देऊ, ही भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांची केवळ घोषणाच राहिली आहे.

---------------------------

यड्रावकर-गणपतराव पाटील एकत्र

आगामी निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी काही कार्यकर्त्यांची मानसिकता असलीतरी स्वीकृत नगरसेवक निवडीवरून यड्रावकर व काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील हे दोघेही पुन्हा एकत्र आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही गट एकत्रच निवडणुका लढविण्याचे संकेत आहेत.

फोटो - २३०८२०२१-जेएवाय-०१-जयसिंगपूर नगरपालिका

Web Title: Experiment of local key development front in Jaysingpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.