विविध प्रकाशकांच्या पाठ्यपुस्तकांच्या प्रमाणीकरणासाठी तज्ज्ञ समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 AM2021-04-02T04:24:23+5:302021-04-02T04:24:23+5:30
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास अनुसरून अनेक प्रकाशनांकडून पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात. या पाठ्यपुस्तकांमध्ये काही वेळेस आक्षेपार्ह मजकूर छापल्याने वादाचे प्रसंग ओढवले ...
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास अनुसरून अनेक प्रकाशनांकडून पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात. या पाठ्यपुस्तकांमध्ये काही वेळेस आक्षेपार्ह मजकूर छापल्याने वादाचे प्रसंग ओढवले आहेत. विद्यार्थ्यांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जाऊ नये. त्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडू नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने विद्यापीठात गुरुवारी व्यवस्थापन परिषद हॉलमध्ये विशेष बैठक घेण्यात आली. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासंबंधित कोणत्याही प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित होताना त्यातील मजकूर विद्यापीठाकडून तपासून घेण्यात यावा, अशी सूचना खासदार संभाजीराजे यांनी केली. बी. ए., एम.ए. इतिहास या विषयाच्या अभ्यासक्रमात महाराणी ताराबाई राणीसाहेब, कोल्हापूरच्या महाराणी जिजाबाईसाहेब, क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज, करवीर राज्याचा इतिहास समाविष्ट करण्यात यावा. प्रकाशकांच्या पाठ्यपुस्तकांच्या प्रमाणीकरणासाठी विद्यापीठाने तज्ज्ञ समिती नियुक्त करावी, अशी सूचना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केली. विद्यापीठाचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्याबाबत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी इतिहास विभागप्रमुखांना सूचना दिल्या. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, इतिहास विभागप्रमुख अवनिश पाटील, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, राम यादव, राहुल शिंदे, आदी उपस्थित होते.
चौकट
अभ्यास साहित्य विद्यापीठाने प्रकाशित करावे
विद्यापीठाचा अभ्यासक्रम पारंपरिक असून त्यामध्ये योग्य बदल करावेत. पाठ्यपुस्तके आणि अभ्यासाचे साहित्य विद्यापीठानेच प्रकाशित करावे. त्यासाठी आम्ही मदत करण्यास तयार आहोत, असे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सांगितले.
फोटो (०१०४२०२१-कोल-विद्यापीठ बैठक) : शिवाजी विद्यापीठात गुरुवारी विविध प्रकाशकांच्या पाठ्यपुस्तकांच्या प्रकाशनाबाबत विशेष बैठकीत खासदार संभाजीराजे यांनी सूचना केल्या. यावेळी शेजारी डॉ. जयसिंगराव पवार, पी. एस. पाटील, डी. टी. शिर्के, विलास नांदवडेकर, इंद्रजित सावंत, राम यादव, आदी उपस्थित होते.
===Photopath===
010421\01kol_9_01042021_5.jpg
===Caption===
फोटो (०१०४२०२१-कोल-विद्यापीठ बैठक) : शिवाजी विद्यापीठात गुरूवारी विविध प्रकाशकांच्या पाठ्यपुस्तकांच्या प्रकाशनाबाबत विशेष बैठकीत खासदार संभाजीराजे यांनी सूचना केल्या. यावेळी शेजारी डॉ. जयसिंगराव पवार, पी. एस. पाटील, डी. टी. शिर्के, विलास नांदवडेकर, इंद्रजित सावंत, राम यादव, आदी उपस्थित होते.