अवसान बाजीरावाचे अन् दुकान नाडापुडीचे

By admin | Published: May 30, 2016 01:21 AM2016-05-30T01:21:13+5:302016-05-30T01:27:18+5:30

हाळवणकरांची मुश्रीफांवर टीका : नंगे-पुंगे आडवे आले तरीही प्रकल्प पूर्ण करणारच

Expires Bajirao's and shop Nadapudi | अवसान बाजीरावाचे अन् दुकान नाडापुडीचे

अवसान बाजीरावाचे अन् दुकान नाडापुडीचे

Next

कोल्हापूर : चिकोत्रा खोऱ्याचा आपण भूमिपुत्र असल्याने येथील शेतकऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न केले तर त्यात गैर काय? पण काही मंडळींना ते रुचले नाही. एक वर्षात आपला खासगी साखर कारखाना काढता, मग नागनवाडी प्रकल्प पंधरा वर्षांत पूर्ण का होत नाही, अशी विचारणा करत हसन मुश्रीफ म्हणजे ‘अवसान बाजीरावाचे अन् दुकान नाडापुडी’चे असल्याची टीका आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली. नंग्या-पुंग्यांना घाबरत नसून कोणीही आडवे आले तरी प्रकल्प मार्गी लावणारच, असा इशाराही त्यांनी दिला.
तमनाकवाडा (ता. कागल) येथील पाणी परिषदेवरून गेले दोन दिवस आमदार हसन मुश्रीफ यांनी आमदार हाळवणकर यांच्यावर टीका केली होती. त्याला पाणी परिषदेत हाळवणकर यांनी उत्तर दिले.
ते पुढे म्हणाले, राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून जनभावनाचा आदर करायला शिकले पाहिजे; पण काही मंडळींना २४ तास राजकारणाशिवाय काहीच सुचत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह के. पी. पाटील यांना बोलावले होते. जलसंपदा मंत्री असताना ज्यांना नागनवाडीचा प्रश्न सोडविता आला नाही, त्यांना बोलावले तर शेतकऱ्यांचा रोष ओढावून दगडफेक करतील, यासाठीच हसन मुश्रीफ यांना निमंत्रित केले नाही; पण हाळवणकरांचा कागलशी काय संबंध, अशी विचारणा करतात, आपण धामणी (आजरा) या गावचा भूमिपुत्र आहे, याचा विसर मुश्रीफ यांना पडला आहे. या परिसरातील भूमिपुत्र म्हणून येथील शेतकऱ्यांच्या जीवनात सुख आणण्यासाठी प्रयत्न केला त्यात गैर काय केले. एका वर्षात स्वत:चा साखर कारखाना उभा करता मग पंधरा वर्षे हा प्रकल्प मार्गी का लावला नाही. सत्ता गेली तरी अजून मुश्रीफ यांच्या डोक्यातील सत्तेची मस्ती गेलेली नाही. आम्हीही छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे, असे नंग्या-पुंग्यांना घाबरत नाही. कितीही राजकीय ताकद आडवी आली तरी प्रकल्प पूर्ण करणारच, असा इशाराही हाळवणकर यांनी दिला. शेतकऱ्यांनी कोणाचेही ऐकू नका, तुमचा विश्वासघात केला जाणार नाही, एकीची वज्रमूठ बांधून हरितक्रांती आणूया, असेही त्यांनी सांगितले.
आमदार प्रकाश आबिटकर यांनी जोरदार फटकेबाजी करत हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘म्हातारीचा सडा’ पाण्याबाबत मुश्रीफ यांनी आपल्यावर टीका केली पण त्याचा दुसऱ्या प्रकल्पांवर काही परिणाम होईल का? यासाठी वनविभागाची चर्चा सुरू होती. विकासकामांत आम्ही कधीच आडवे येत नाही, येत्या चार-आठ दिवसांत त्याचे उद्घाटन होईल, असे आबिटकर यांनी सांगितले.
कागलचा हत्ती अन् दादांची मिरवणूक!
‘राजकारणातील स्वच्छ चेहरा’ म्हणून सामान्य माणूस चंद्रकांतदादांकडे पाहतो. वसंतदादांनंतर चंद्रकांतदादा असल्याने खूप अपेक्षा आहेत. दादा, येथील काही मंडळी हत्तीवरून मिरवणूक काढण्याची भाषा करतात. सर्व प्रकल्प मार्गी लावून १० टीएमसी पाणी अडवा, तुमची कागलमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे आमदार आबिटकर म्हणाले.

Web Title: Expires Bajirao's and shop Nadapudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.