कोल्हापूर : ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ दालन माहितीपूर्ण : शौमिका महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 06:28 PM2019-01-02T18:28:50+5:302019-01-02T18:30:59+5:30

संपूर्ण आजरा तालुक्याचा आढावा घेणारे ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ हे दालन माहितीपूर्ण असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली.

Explained: 'Shravika Prajra Parishad': Shohmika Mahadik | कोल्हापूर : ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ दालन माहितीपूर्ण : शौमिका महाडिक

आजरा येथील ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ या दालनाला जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी भेट दिली.

Next
ठळक मुद्दे‘दृष्टिक्षेपातील आजरा’ दालन माहितीपूर्ण : शौमिका महाडिकआजऱ्यातील दालनाला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची भेट

आजरा : संपूर्ण आजरा तालुक्याचा आढावा घेणारे ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ हे दालन माहितीपूर्ण असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या या दालनाला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी ‘निर्धार प्रतिष्ठान’च्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या दालनाविषयी प्रशंसोद्गार काढले.

तहसीलदार अनिता देशमुख यांनी सुरुवातीला स्वागत करून या दालनामागील हेतू सांगितला. मी ज्या तालुक्यामध्ये कार्यरत आहे, त्या तालुक्याची शक्य ती माहिती संकलित करून नागरिकांसमोर मांडावी, या हेतूने या दालनाची उभारणी करण्यात आली आहे.

यासाठी समीर देशपांडे आणि निर्धार प्रतिष्ठानचे चांगले सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सादर करण्यात आलेल्या आजऱ्यांवरील माहितीपटालाही उपस्थितांनी दाद दिली.
शौमिका महाडिक म्हणाल्या, अशा पद्धतीने तालुक्याचा आणि कर्तबगार व्यक्तिमत्त्वांचा आढावा घेणारे दालन कोल्हापूर जिल्ह्यात इतरत्र पाहण्यात आले नाही. त्यामुळे आजऱ्यांतील हा उपक्रम अनुकरणीय आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सर्जेराव पाटील-पेरीडकर, वंदना मगदूम, गटनेता अरुण इंगवले, युवराज पाटील, जयवंतराव शिंपी, कल्लाप्पा भोगण, राहुल आवाडे, राजवर्धन निंबाळकर, आजºयाच्या सभापती रचना होलम, पंचायत समिती सदस्या वर्षा बागडी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, रवी शिवदास, रविकांत आडसूळ, प्रियदर्शिनी मोरे, तुषार बुरुड उपस्थित होते.

अशा पद्धतीचे दालन जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये उभारण्यात यावे, अशी मागणी यावेळी ‘निर्धार प्रतिष्ठान’च्या वतीने अ‍ॅड. सचिन इंजल आणि विनय सबनीस यांनी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याकडे केली.



 

Web Title: Explained: 'Shravika Prajra Parishad': Shohmika Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.