जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा विस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:41+5:302021-04-26T04:22:41+5:30
कोल्हापूर : शनिवारी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने दिलेला दिलासा रविवारी मात्र विस्फोटात बदलला. एकाच दिवसात तब्बल १०७१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह ...
कोल्हापूर : शनिवारी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने दिलेला दिलासा रविवारी मात्र विस्फोटात बदलला. एकाच दिवसात तब्बल १०७१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या कोल्हापुरातील दुसऱ्या लाटेतील ही सर्वाधिक रुग्ण व मृत्यूसंख्या ठरली आहे.
कोल्हापुरात लॉकडाऊन कडक झाल्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाबधितांची संख्या वाढतच चालली होती. ही संख्या ९९८ पर्यंत पोहोचल्याने चिंता वाढली होती. शनिवारी मात्र एकदम ७८४ पर्यंत रुग्णसंख्या खाली आली होती. या दिलाशामुळे काहीशी चिंता कमी झाली होती, पण रविवारी एकदम बधितांच्या संख्येने उसळी घेत पहिल्यांदाच रुग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडल्याने चिंतेत मोठी भर पडली आहे. त्यातच मृत्यूची संख्याही वाढल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
रविवारी कोल्हापूर शहरात नवे २९१ रुग्ण आढळले. नगरपालिका क्षेत्रात ९३ रुग्ण आढळले. ग्रामीण भागात करवीर तालुक्यात पुन्हा एकदा १२३ इतकी सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली आहे. पाठोपाठ हातकणंगेलाचा आकडा १२० वर पोहोचला आहे.
चौकट ०१
जिल्ह्यात रविवारी २९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शनिवारी ही संख्या ३५७ इतकी होती. रुग्णसंख्या वाढत असताना बरे होण्याचे प्रमाणही पुन्हा एकदा कमी झाले आहे.
चौकट ०२
रविवारी मृत्यू झालेल्या ३१ जणांपैकी ११ जणांचा सीपीआरमध्ये, तर तिघांचा इचलकरंजीतील आयजीएममध्ये मृत्यू झाला आहे. उर्वरित १६ जणांचा खाजगी दवाखान्यात बळी गेला आहे.
लोकमत कोरोना अपडेट
रविवार २५-०४-२०२१
आजचे रुग्ण : १०७१
आजचे जिल्ह्यातील मृत्यू : ३२
उपचार घेत असलेले : ७३५८
आजचे डिस्चार्ज : २९५
सर्वाधिक रुग्ण
कोल्हापूर शहर : २९१
नगरपालिका : ९३
इतर जिल्ह्यातील : ६४
तालुक्यातील रुग्णसंख्या
गडहिंग्लज - २८
शाहूवाडी - ६९
गगनबावडा -२१
आजरा-१७
भुदरगड-४२
हातकणंगले : १२०
करवीर : १२३
पन्हाळा : ७६
चंदगड : २५
कागल - ३१
राधानगरी : ०८