पावसाची उघडीप, अनेक मार्ग वाहतुकीला खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:47+5:302021-07-26T04:23:47+5:30

चंदगड : गेल्या दोन-तीन दिवसांपासून हाहाकार उडवलेल्या पावसाने रविवारी उघडीप दिली. त्यामुळे पाण्याखाली असलेल्या बेळगाव - वेंगुर्ला मार्गासह अनेक ...

Exposure to rain, many routes open to traffic | पावसाची उघडीप, अनेक मार्ग वाहतुकीला खुले

पावसाची उघडीप, अनेक मार्ग वाहतुकीला खुले

Next

चंदगड : गेल्या दोन-तीन दिवसांपासून हाहाकार उडवलेल्या पावसाने रविवारी उघडीप दिली. त्यामुळे पाण्याखाली असलेल्या बेळगाव - वेंगुर्ला मार्गासह अनेक मार्ग खुले झाले आहेत.

गुरूवारी व शुक्रवारी चंदगड तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे तालुक्यातील घटप्रभा, ताम्रपर्णी या नद्यांसह अनेक ओढ्यांवर पाणी आल्याने दाटेजवळ बेळगाव - वेंगुर्ला मार्गासह तिलारीकडे जाणारा, कोवाडकडे जाणारे अनेक मार्ग बंद होते. तसेच ४० ते ४२ वर्षांनंतर अडकूर पुलावर पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीला बंद होता.

घटप्रभा धरणातून घटप्रभा नदीत व झांबरे धरणातून ताम्रपर्णी नदीत पाणी सोडल्याने नदीकाठच्या लोकांना महापुराचा फटका बसला. कानडी येथील १५ कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले तसेच १९ गावांमध्ये ५३ घरांचे पुराच्या पाण्यामुळे व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील ९०० लोकांचे स्थलांतर करावे लागले.

फोटो ओळी : कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठेत ताम्रपर्णी नदीचे पाणी घुसून व्यापारी व दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

क्रमांक : २५०७२०२१-गड-०४

Web Title: Exposure to rain, many routes open to traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.