वायूदलाच्या कारवाईबद्दल कोल्हापुरात आनंद व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:07 AM2019-02-27T11:07:30+5:302019-02-27T11:12:36+5:30

भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या सैन्य कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेचा ऊर भरून आला. पुलवामा घटनेत ५० जवान शहीद झाले होते. त्याचा बदला भारताने घेतल्याने या कारवाईनंतर कोल्हापुरात नागरिकांनी पेढे, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी फटाके वाजवूनही जल्लोष करण्यात आला.

Expressed pleasure in Kolhapur for the action of the Vaudula | वायूदलाच्या कारवाईबद्दल कोल्हापुरात आनंद व्यक्त

भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये सैनिकी कारवाई केल्यानंतर मंगळवारी कोल्हापुरातील महाद्वार रोडवर व्यापारी, फेरीवाले, आदींनी एकत्र येऊन साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

Next
ठळक मुद्देवायूदलाच्या कारवाईबद्दल कोल्हापुरात आनंद व्यक्तपेढे, जिलेबी वाटून, फटाके वाजवून आनंद

कोल्हापूर : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या सैन्य कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेचा ऊर भरून आला. पुलवामा घटनेत ५० जवान शहीद झाले होते. त्याचा बदला भारताने घेतल्याने या कारवाईनंतर कोल्हापुरात नागरिकांनी पेढे, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी फटाके वाजवूनही जल्लोष करण्यात आला.


भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये सैनिकी कारवाई केल्यानंतर मंगळवारी कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात भारतीय वायूदलाचे अभिनंदन करणारा असा फलक लगेच झळकला.

येथील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करणारा भला मोठा डिजिटल फलक दुपारीच झळकला. महाद्वार रोडवर व्यापारी, फेरीवाले, सर्वसामान्य नागरिक एकत्र आले व त्यांनी पेढे-साखर वाटून या कारवाईचा आनंद साजरा केला. येथील मध्यवर्ती शिवाजी चौकातही असेच सर्वसामान्य नागरिक एकत्र झाले. त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली व जिलेबीचे वाटप केले. भारतमाता की... जय! अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पहाटे बिंदु चौक येथे फटाके फोडून, साखर वाटून व भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सेना जिंदाबाद घोषणा देऊन या कारवाईच स्वागत केले.

पुलवामा घटनेत जवान शहीद होऊन आज १३ दिवस झाले; त्यामुळे भाजपने पक्ष म्हणून तातडीने लगेच आनंद किंवा जल्लोष साजरा केला नाही. त्याबद्दल लोकांतून काय प्रतिक्रिया व्यक्त होते याचा आनंद घेण्यात येत होता.
 

 

Web Title: Expressed pleasure in Kolhapur for the action of the Vaudula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.